12 December 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

BEL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश
  • मागील 1 वर्षात 105 टक्के परतावा दिला
  • अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग – NSE:BEL
  • ऑर्डरबुक आणि स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड – BEL Share
BEL Share Price

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. 16-20 सप्टेंबर दरम्यान या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स 4.5 टक्के घसरले होते. मागील एका महिन्यात भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीचे शेअर्स 9.14 टक्के घसरले होते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये पुढील काळात 20 ते 40 टक्के चढ-उतार पाहायला मिळू शकते. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,02,846.36 कोटी रुपये आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)

मागील 1 वर्षात 105 टक्के परतावा दिला
17-19 सप्टेंबर दरम्यान सलग तीन दिवस भारत इलेक्ट्रॉनिक स्टॉक 6 टक्के घसरला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 105.25 टक्के वाढली आहे. अल्फा स्प्रेडनुसार, एका बीईएल स्टॉकचे DCF मूल्य 89.48 रुपये आहे. हे प्रमाण सध्याच्या 277.35 रुपये या किमतीच्या तुलनेत 68 टक्के जास्त आहे. आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के वाढीसह 287.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
शेअर बाजारातील जवळपास 24 तज्ञांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये या या स्टॉकचा EPS 16.1 टक्के वाढण्याची अपेक्षा आहे. तज्ञांच्या मते पुढील बारा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 331.61 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 19.6 टक्के वाढू शकतो. ब्रोकरेज अँटिक स्टॉक ब्रोकिंगने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन 385 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे.

ऑर्डरबुक आणि स्टॉक स्प्लिट रेकॉर्ड
नुकताच कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीने भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला एक्स बँडमधील स्वदेशी मल्टी-फंक्शन रडारच्या पुरवठ्यासाठी 850 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले होते. DRDO द्वारे डिझाइन केलेले आणि BEL द्वारे उत्पादित केलेले हे पूर्णपणे स्वदेशी रडार नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी, हवाई लक्ष्य शोधण्यास. सक्षम आहेत. चालू आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 0.80 रुपये म्हणजेच 80 टक्के लाभांश वाटप केला आहे. यासह भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने एक वेळा स्टॉक स्प्लिट केला होता. 2017 मध्ये या कंपनीने आपले शेअर्स दहा शेअर्समध्ये विभाजित केले होते.

2015 पासून आत्तापर्यंत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा बोनस शेअर वाटप केले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीने सप्टेंबर 2015 मध्ये 2:1 या प्रमाणात, सप्टेंबर 2017 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 1:10 आणि 2:1 प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सरकारी कंपनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी नवरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. कंपनी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि यंत्रणा तयार करण्याचा व्यवसाय करते.

भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने होमलँड सिक्युरिटी सोल्यूशन्स, स्मार्ट शहरे, ई-गव्हर्नन्स सोल्यूशन्स, उपग्रह एकत्रीकरणासह स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, ई-वाहन चार्जिंग स्टेशनसह ऊर्जा साठवण उत्पादने, सौर, नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, रेल्वे आणि मेट्रो सोल्यूशन्स, विमानतळ सोल्यूशन्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये जबरदस्त काम केले आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, दूरसंचार उत्पादने, निष्क्रिय नाईट व्हिजन उपकरणे, वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स, कंपोझिट आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देखील तयार करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 24 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x