15 December 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

BEL Share Price | पैशाचा खजाना आहे हा PSU शेअर! तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मल्टिबॅगर कमाई होईल

BEL Share Price

BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षात 5,225 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. मजबूत ऑर्डर बुक आणि स्ट्रक्चरल अपट्रेंड पाहता, देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने बीईएल या नवरत्न कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )

शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी बीईएल कंपनीने 230 कोटी रुपये ऑर्डर मिळाल्याची माहिती दिली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 1.51 टक्के घसरणीसह 326.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने बीईएल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सवर 387 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तसेच 307 रुपये स्टॉपलॉस जाहीर केला आहे. तज्ञांनी हा स्टॉक 326 रुपये ते 334 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे. जर तुम्ही हा स्टॉक सध्याच्या किंमतीवर खरेदी केला तर तुम्हाला 12.5 टक्के नफा सहज मिळू शकतो.

ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय संरक्षण क्षेत्र मागील काही आठवड्यांपासून चर्चेत आले आहे. तसेच बीईएल कंपनीच्या स्टॉकने आपल्या 50 दिवसांच्या EMA पातळीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 161 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 81 टक्क्यांनी वाढली आहे.

2024 या वर्षात बीईएल स्टॉक 80 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. बीईएल कंपनीचे शेअर्स मागील 2 वर्षांत 332 टक्के, 3 वर्षांत 444 टक्के आणि 5 वर्षांत 844 टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.55 रुपये होती. बीईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,43,634.93 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x