28 April 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Company For Sale | तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स आहेत किंवा घेणार आहात? | ही महत्वाची घडामोड जाणून घ्या

Company For Sale

Company For Sale | अनिल अंबानी यांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या (आरसीएल) रिझॉल्यूशन प्लॅनसाठी निविदा सादर करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचे कंपनीच्या कर्जदात्यांनी मान्य केले आहे. ही माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, निविदाकारांकडून (बिडर्स) आतापर्यंत मिळालेला थंड प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Lenders have agreed to extend the last date for submission of bids to June 30 for the resolution plan of Anil Ambani’s debt-ridden Reliance Capital Limited (RCL) :

यामुळे हा निर्णय घेण्यात आला : RCL For Sale
यापूर्वी रिलायन्स कॅपिटलसाठी रिझोल्युशन प्लॅन सादर करण्यासाठी कर्जदात्यांच्या समितीने (सीओसी) २६ मे ही अंतिम मुदत निश्चित केली होती. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर निविदाधारकांकडून (बिडर्स) थंड प्रतिसाद लक्षात घेता कर्जदात्यांनी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी सांगितले की, 54 संभाव्य रिझोल्यूशन अर्जदारांपैकी (पीआरए) आतापर्यंत केवळ आठ निविदाकारांनी कर्जदात्यांशी संपर्क साधला आहे.

प्रकरण कुठे अडकले आहे – Reliance Capital Share Price
ते म्हणाले की, 54 निविदाकारांपैकी 45 जणांनी कर्जदात्यांच्या समितीशी संपर्क साधला नाही आणि बोलणी पूर्णपणे “निष्क्रिय” राहिल्या आहेत. आठ निविदाकारांपैकी पाच जणांनी रिलायन्स कॅपिटलच्या प्रशासकाकडे काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे, तर केवळ तीन जणांनी व्यवस्थापनाबरोबर ठराव प्रक्रियेसंदर्भात बैठका घेतल्या आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि जागतिक पातळीवर आव्हानात्मक परिस्थिती यामुळे बहुतांश निविदाकारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी कर्जदात्यांच्या हवाल्याने सांगितले.

निविदाकारांना दोन पर्याय देण्यात आले होते :
आरसीएलकडून सर्व निविदाकारांना दोन पर्याय देण्यात आले. पहिल्या पर्यायात आरसीएल आणि त्याच्या उपकंपनीसाठी बोली लावता येऊ शकते, तर दुसऱ्या पर्यायात सहाय्यक कंपन्यांसाठी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे बोली लावण्याची मुभा देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने 29 नोव्हेंबर 2021 रोजी आरएलसीचे बोर्ड बरखास्त केले होते आणि दिवाळखोरीची कार्यवाही करण्यासाठी नागेश्वर राव वाय यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.बुधवार

News Title: Company For Sale Reliance Capital Share Price going down check details 14 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x