13 December 2024 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

SBI FD Vs SBI Annuity Deposit | एसबीआय FD स्कीम की SBI अ‍ॅन्युइटी डिपॉझिट योजना फायद्याची? दरमहा अधिक कमाई कुठे पहा

SBI FD Vs SBI Annuity Deposit

SBI FD Vs SBI Annuity Deposit | सध्या जर तुम्ही एक्स्ट्रा रेग्युलर इन्कमच्या शोधत असाल तर तुम्हाला SBI मधील गुंतवणूक पर्याय मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया/SBI मधील गुंतवणूक पर्याय तुम्हाला अद्भूत परतावा कमावून देऊ शकतात. तुमच्या कडे दोन गुंतवणूक पर्याय आहेत, एक आहे, SBI FD आणि दुसरा आहे SBI Annuity Deposit.

SBI Annuity Deposit या योजनेत तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून चांगला परतावा कमवू शकतात. एका ठराविक कालावधीनंतर दर मासिक हफ्त्यात तुम्हाला हमी परतावा मिळेल. SBI ची Annuity Deposit Scheme तुम्हाला दरमहा मूळ रकमेवर व्याज परतावा देत राहील. या योजनेत मिळणारे व्याज तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेवर दर तिमाहीत चक्रवाढ पद्धतीने मोजले जातात. ही योजना बँकेच्या मुदत ठेवी म्हणजेच FD इतकेच रिटर्न्स देते.

दुसरीकडे, जर तुम्ही SBI च्या मुदत ठेव म्हणजे FD योजनेत पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला बँकेने ठरवून दिलेल्या व्याज दराने निश्चित कालावधीनुसार वार्षिक मुदतपूर्तीच्या तारखेला एफडी खात्यात जमा शिल्लक रकमेवर व्याज परतावा दिला जाईल.

SBI मध्ये FD वर मिळणारा व्याज परतावा :
SBI मध्ये 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.50 टक्के या दराने व्याज परतावा मिळतो. पूर्वी हा व्याज दर 4.70 टक्के होता, मात्र SBI ने नंतर त्यात 80 पॉइंट्सची वाढ केली. नवीन व्याज दर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. याशिवाय SBI बँक 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीसाठी परिपक्व होणाऱ्या FD वर 4.65 टक्के व्याज दराने परतावा देते. त्याचप्रमाणे 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर पूर्वी 5.65 टक्के व्याज मिळत होता, आता त्यात वाढ झाली असून 6.25 टक्के दराने व्याज परतावा मिळतो.

व्याज परतावा :
SBI Annuity Deposit योजनेत रक्कम जमा केल्यास पुढील महिन्यापासून निश्चित तारखेला एन्युटी रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. समजा एखाद्या महिन्यात 29, 30 आणि 31 तारीख नसेल तर त्यापुढील महिन्याच्या 1 तरिखला एन्यूटी रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. तुमची एन्यूटी रक्कम टीडीएस कापल्यानंतर तुमच्या लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केली जाते.

एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम :
एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येते. ही योजना SBI बँकेच्या सर्व शाखांमध्ये आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. या योजना खात्यात कमाल गुंतवणूक रकमेची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला एक युनिव्हर्सल पासबुकही इश्यू केले जाईल. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडून गुंतवणूक सुरू करु शकतो. अल्पवयीन मुलांच्या नावानेही योजनेत पैसे जमा करता येतात. ही योजना आपल्या ग्राहकांना एकल किंवा जॉइंट खाते उघडण्याची मुभा देते.

SBI च्या अॅन्युइटी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागतील. या योजनेत कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. अॅन्युइटी योजनेत ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर ग्राहकाना जमा केलेल्या रकमेवर दरमहा व्याज मिळायला सुरूवात होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Comparison between SBI FD and SBI Annuity Deposit Scheme for investment and earn huge returns on 13 December 2022.

हॅशटॅग्स

SBI FD Vs SBI Annuity Deposit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x