3 May 2024 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Credit Card New Rules | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? | मग आता अडचणी येणार नाहीत | अधिक जाणून घ्या

Credit Card New Rules

Credit Card New Rules | देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयने क्रेडिट कार्डच्या नियमांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये करण्यात आलेले बदल पुढील महिन्यात १ जुलैपासून लागू होणार आहेत. त्याचबरोबर राज्य सहकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळता इतर सर्व बँकांना नवे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांना ग्राहकाच्या परवानगीशिवाय कार्ड देता येणार नाही.

बिलिंग सायकलमध्ये बदल :
नव्या नियमांनुसार आता बिलिंग सायकलमध्येही बदल होणार आहे. 1 जुलैपासून क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल महिन्याच्या 11 तारखेपासून सुरू होणार असून पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे बिलिंग सुरू राहणार आहे.

ग्राहकाच्या विनंतीनुसार 7 दिवसांत कार्ड बंद करावं लागणार अन्यथा बँकांना दंड :
ग्राहकाच्या विनंतीनुसार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेला केवळ 7 दिवसात कार्ड बंद करावे लागणार आहे. इतकंच नाही तर त्याची माहितीही ग्राहकाला द्यावी लागणार आहे. याशिवाय 7 दिवसांच्या आत हे काम न केल्यास बँक किंवा वित्तीय संस्थेला दररोज 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. कार्डची थकबाकी भरल्यास हा नियम लागू होणार नाही.

चुकीचे बिल पाठवण्याची जबाबदारी असेल :
नव्या नियमांनुसार बँका किंवा वित्तसंस्था ग्राहकांना चुकीची बिले पाठवू शकत नाहीत. त्यांनी तसे केल्यास कार्ड जारी करणाऱ्या संस्थेला त्याला प्रतिसाद द्यावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Credit Card New Rules check details here 30 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x