4 May 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Easy Trip Planners Share Price | अवघ्या 2 वर्षात बंपर परतावा, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने शेअरची संख्या वाढवली

Easy Trip Planners Share Price

Easy Trip Planners Share Price | ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचे शेअर्स मार्च 2021 मध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते, आणि तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ‘इझी ट्रिप प्लॅनर्स’ कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये 186 ते 187 रुपये या प्राइस बँडवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO अंतर्गत कंपनीने एका लॉटमध्ये 80 शेअर्स जारी केले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 13 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाली होती. या सकारात्मक सुरुवातीनंतर इझी ट्रिप कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढू लागला. ज्या गुंतवणुकदारांना IPO शेअर मिळाले होते, त्यांना लिस्टिंग प्रॉफिट तर मिळालाच सोबत ज्या लोकांनी स्टॉक होल्ड करून ठेवले होते, त्यांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ मिळाला. जय लोकांनी स्टॉक होल्ड केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Easy Trip Planners Share Price | Easy Trip Planners Stock Price | BSE 543272 | NSE EASEMYTRIP)

‘ईज़ माय ट्रिप’ बोनस शेअर :
या कंपनीने स्टॉक लिस्टिंगनंतर गुंतवणुकदारांना दोनवेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. कंपनीने प्रथम फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. त्या वेळी कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला होता. त्यांनतर कंपनी नोव्हेंबर 2022 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच या वेळी कंपनीने गुंतवणुकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर मोफत दिला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन केले होते. आणि त्यावेळी कंपनीने आपले शेअर्स दोन भागात विभाजित केले होते.

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा :
इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एक लॉटमध्ये 80 शेअर्स वाटप केले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केल्यावर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 160 पर्यंत वाढली. नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीने 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 640 पर्यंत वाढली होती. आणि त्या नंतर या कंपनीने 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 1280 पर्यंत वाढली. अशाप्रकारे ज्यां लोकांना IPO मध्ये 80 शेअर्स वाटप करण्यात आले होते, त्यांच्या शेअरची संख्या वाढून 1280 झाली आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचा IPO मार्च 2021 मध्ये 187 रुपये या किमतीवर गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO लॉटमध्ये 80 शेअर्स जारी करण्यात आले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 14,960 रुपये खर्च करावे लागले होते. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी Easy Trip Planners कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के घसरणीसह 54.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले असते तर तुमच्या 80 शेअरमध्ये आता 1200 शेअरची वाढ झाली असती. आणि अवघ्या दोन वर्षांत तुमच्या 14,960 रुपये गुंतवणुकीचे मूल्य 70,400 रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Easy Trip Planners Share Price 543272 Easemytrip stock market live on 23 January 2023.

हॅशटॅग्स

#Easy Trip Planners Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x