12 December 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Money Making Share | मनी मेकिंग मशीन! हा फंड मॅनेजर ज्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतो तिथे पैशाचा पाऊस पडतो, कोणते स्टॉक पहा

Money making Share

Money Making Share | म्युचुअल फंड बाजारात जे तज्ञ पैशाचे व्यवस्थापन करतात, आणि पैसे विविध स्टॉक आणि कंपनी मध्ये गुंतवतात त्यांना फंड मॅनेजर असे म्हणतात. हे लोक म्युच्युअल फंड किंवा अनेक लोकांचे पैसे मनी मार्केटमध्ये गुंतवून त्यांचे व्यवस्थापन करतात. हे काम करण्यासाठी मनी मार्केटचे जबरदस्त ज्ञान आणि जलद विचार करण्याचे गुण असणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका फंड मॅनेजरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.

या फंड मॅनेजर बद्दल माहिती देण्याचे कारण असे की, त्यांनी मागील 10 वर्षांत 1 कोटी रुपये गुंतवणूकीवर 13 कोटी रुपये परतावा कमावला आहे. अशा प्रतिभावान आणि गुणसंपन्न फंड मॅनेजर चे नाव आहे, सिद्धार्थ भैय्या. यांनी आपल्या गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशाचा पाऊसच पडला आहे. सिद्धार्थ भैय्या मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांना मनी मार्केटमध्ये काम करण्याचा 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. सिद्धार्थ भैय्या सध्या चर्चेचा विषय बनले आहेत, कारण मागील 10 वर्षांत त्यानी ज्या शेअर्समध्ये हात टाकला त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक शेअर्समध्ये 100 पट वाढ पाहायला मिळाली आहे. त्यांच्या इक्विटास इन्व्हेस्टमेंट इंडिया अपॉर्च्युनिटी या पोर्टफोलिओ स्कीमने फेब्रुवारी 2013 पासून आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या हिशोबानुसार त्यांच्या 1 कोटी रुपये गुंतवणूकीवर 13 कोटीचा परतावा मिळाला आहे.

कोणत्या स्टॉक मधून परतावा?
एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ भैयायांनी कोणत्या स्टॉक मधून किती परतावा कमावला याची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांना अवंती फीड्समधून 100 पट रिटर्न्स, फिनोलेक्स केबल आणि HEG मधून 20 पट रिटर्न्स, मैथॉन अलॉयज आणि नीलकमलने 15 पट रिटर्न्स, HIL आणि Gerware टेक्निकल फायबर्स, CCL प्रॉडक्ट्स मधून 10 पट रिटर्न मिळाला आहे. याशिवाय त्यांनी एस्ट्रल पॉली, रॅलिस इंडिया, आयपीसीए लॅबोरेटरीज, बजाज फायनान्स आणि गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्समध्ये गुंतवणूक करून अद्भूत कमाई केली आहे.

सिद्धार्थ भैया यांची गुंतवणुकीची युक्ती : सिद्धार्थ भैय्या नेहमी आपल्या क्षेत्रात मार्केट लीडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मूलभूत व्यवस्थापन मजबूत असणाऱ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. ते म्हणतात की वॉरेन बफेटप्रमाणे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ही चांगले स्टॉक आहेत, जे दीर्घकाळ ठेवल्याने कमालीचा परतावा देतात. सिद्धार्थ भैया आवर्जून म्हणतात की, लोकांनी इतरांकडून टिप्स घेऊन कोणतीही गुंतवणूक करू नये. जो कोणी अशा टिप्स देत आहे ते आपले लक्ष साध्य करेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यात जोखीम ही जास्त असते, आणि दुसऱ्यांचे ऐकून गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे ही बुडू शकतात. तर अशी जोखीम न घेण्याचा सल्ला सिद्धार्थ भैया देतात.

सध्या भारतीय शेअर बाजाराची स्थिती : सिद्धार्थ भैया यांच्यामते स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपन्याची स्थिती लार्ज कंपन्याच्या तुलनेत बरी आहे. यासोबतच ते गुंतवणूकदारांना चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देतात. सोबत त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना आपल्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सिद्धार्थ भैयाच्या मते नेहमी सुरक्षित मार्जिनने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात चांगला परतावा मिळतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Fund Manager Sidharth Bhaiya has Earned huge returns in past 10 years check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x