14 December 2024 10:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Govt Employees GPF Interest Rate | सरकारी कर्मचाऱ्यांच्या GPF व्याजबाबत महत्वाची अपडेट! किती बदलले व्याजदर?

Govt Employees GPF Interest Rate

Govt Employees GPF Interest Rate | केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी जनरल पीएफ अर्थात जीपीएफवरील व्याजदर (GPF Interest Rate) जाहीर केला आहे. या तिमाहीसाठी जीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. हा व्याजदर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू आहे. जीपीएफ (GPF Full Form) ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. सरकारी कर्मचारी आपल्या पगारातील ठराविक भाग अंशदान म्हणून देऊन सभासद होऊ शकतो. GPF Statement

योगदान 6% पेक्षा कमी नाही – GPF Account Slip
जीपीएफ खात्यात केवळ कर्मचारीच योगदान देतो. सरकारकडून कोणतेही योगदान दिले जात नाही. त्यावर सरकारकडून व्याज दिले जाते. तथापि, अंशदानाचा दर कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाच्या 6% पेक्षा कमी नसावा. जास्तीत जास्त योगदान कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 100% असू शकते. या खात्याची मॅच्युरिटी निवृत्तीच्या वेळी असते.

याशिवाय जीपीएफकडून कर्ज घेण्याची ही सुविधा आहे. ही देखील करबचत योजना आहे. यामध्ये करदात्यांना प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत सूट मिळते. जीपीएफचे व्यवस्थापन कार्मिक, लोक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयांतर्गत पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाद्वारे केले जाते.

पीपीएफच्या व्याजदरात काय बदल?
अल्पबचत- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफच्या व्याजदरातही सरकारने कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी सरकारने ऑक्टोबर तिमाहीसाठी अल्पबचत योजनांमधील केवळ पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेच्या व्याजदरात बदल केला होता. त्याचा व्याजदर ६.५ टक्क्यांवरून ६.७ टक्के करण्यात आला आहे. मात्र, पीपीएफसह इतर सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दर आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Govt Employees GPF Interest Rate 04 October 2023.

हॅशटॅग्स

#Govt Employees GPF Interest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x