13 December 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT
x

Hemang Resources Share Price | या 3 रुपयाच्या शेअरने 2000% परतावा दिला, भरगच्च परतावा देणारा स्टॉक आजही खरेदीला स्वस्त

Hemang Resources Share Price

Hemang Resources Share Price | हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 51 रुपयांवरून 63 रुपयांवर पोहोचली आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 64.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)

हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. शेअर मार्केटमध्ये योग्य स्टॉकवर सट्टा लावून मालामाल होता येते. ज्या गुंतवणूकदारांनी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांनी आतापर्यंत 2000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवर ट्रेड होते, मात्र त्यात वाढ होऊन शेअर्स 64.80 रुपयांवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारात अस्थिरता आणि गोंधळ असताना या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

सहा महिन्यांत शेअरमध्ये वाढ :
हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स पूर्वी भाटिया इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या नावाने ओळखले जाते होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदाराना 20 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना मागील सहा महिन्यांत काही प्रमाणत नफा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर परतावा :
हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, जर तुम्ही या स्मॉल-कॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये महिन्याभरापूर्वी 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.20 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1.30 लाख रुपये झाले असते.

1 लाखावर 21 लाख परतावा :
2022 या वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 22 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही 2021 च्या शेवटच्या महिन्यात किंवा जानेवारी 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 21 लाख रुपये झाले असते.

हेमांग रिसोर्सेस या कंपनीचे शेअर्स जुलै 2011 मध्ये एक्स-बोनस शेअर किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीच्या वतीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर तीन बोनस शेअर्स मोफत वाटप करण्यात आले होते. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 65.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hemang Resources Share Price 531178 in focus check details on 02 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x