16 December 2024 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Hi-Tech Pipes Share Price | 50 रुपयाच्या शेअरने 1600% परतावा दिला, मालामाल करणारा स्टॉक सध्या चर्चेचा विषय बनला, कारण काय?

Hi-Tech Pipes Share Price

Hi-Tech Pipes Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशासह जलद परतावा ही कमावून देतात. असाच दुहेरी फायदा मिळवून देणारा एक स्टॉक आहे ज्यांने लोकांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘हाय-टेक पाईप्स’. या कंपनीचा IPO 2016 साली शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. जेव्हा कंपनीचा IPO आला होता, तेव्हा कंपनीने या IPO ची इश्यू किंमत 50 रुपये निश्चित केली होती. ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आतापर्यंत 1600 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. ही कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे कारण, या कंपनीने योगी सरकारसोबत एक व्यापारी सामंजस्य करार केला आहे. चला तर जाणून घेऊ डिटेलमध्ये. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hi-Tech Pipes Share Price | Hi-Tech Pipes Price | BSE 543411 | NSE HITECH)

हाय टेक पाईप शेअर किंमत इतिहास :
हाय टेक पाईप कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 50 रुपये निश्चित केली होती, आणि शेअर्स 56 रुपयांवर बाजारात सूचीबद्ध झाले होते. कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह लिस्ट झाले होते. हाय-टेक पाईप्स कंपनीच्या IPO मध्ये एक लॉटसाठी 3000 शेअर्स जारी करण्यात आले होते. म्हणजेच एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान 1.50 लाख रुपये जमा करावे लागले होते. पण ज्या गुंतवणूकदारांनी हे स्टॉक आतपर्यंत होल्ड केले आहेत, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 25.62 लाख रुपये झाले आहे. मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी हाय-टेक पाईप्स कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 858 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हाय-टेक पाईप्स कंपनी एक्स डिव्हिडंड डेटवर ट्रेड करत होती. या कंपनीने विद्यमान आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 0.50 रुपये लाभांश ही वाटप केला होता.

सध्या कंपनी चर्चा विषय बनली आहे :
हाय-टेक पाईप्स कंपनीने उत्तर प्रदेश राज्यात पोलाद निर्मिती आणि उत्पादन कारखाना उभारण्यासाठी यूपी राज्य सरकारशी व्यापारी करार केला आहे. कंपनी या प्लांटवर 510 कोटी रुपये खर्च करणार आहे. Hitech पाईप उत्पादन करणाऱ्या कंपनीने माहिती दिली की, ‘इन्व्हेस्ट यूपी’ कार्यक्रमांतर्गत कंपनीने उत्तर प्रदेश सरकारसोबत एक MOU केला आहे. या कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध करून माहिती दिली की, ” हाय-टेक पाईप्स कंपनीने एक उत्पादन कारखाना उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारशी MOU केला आहे. या सामंजस्य करारांतर्गत कंपनी टप्प्याटप्प्याने या प्लांटवर 510 कोटी रुपये खर्च करणार आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
हाय-टेक पाईप्स कंपनीने म्हटले आहे की, व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि उत्तर प्रदेश सरकारचे विशेष प्रोत्साहन पॅकेज यामुळे स्टील ट्यूब आणि पाईप्स् उद्योग क्षेत्रात कंपनी आपले स्थान आणखी मजबूत करेल. हाय टेक पाईप्स कंपनी UP मध्ये तीन दशकांहून अधिक काळापासून काम करत आहे.” राज्य सरकारसोबतचा हा कारखाना उभारणीचा करार UP मध्ये अधिक रोजगार निर्मिती करेल. आणि राज्याचा विकास करेल. कंपनी हा कारखाना उभारणीसाठी 510 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, जी कंपनीच्या व्यापारी क्षमता आणि उद्योग विस्तार योजनांची वाढ करण्यास मदत करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hi-Tech Pipes Share Price 543411 HITECH in focus check details on 10 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x