29 April 2024 11:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Home Loan Documents | गृह कर्ज घ्याल तेव्हा घ्याल, पण सर्व कागदपत्रं असणं मोठं काम, म्हणून ही यादी लक्षात ठेवा, कामी येईल

Home Loan Documents

Home Loan Documents | घर खरेदीचे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहतो. यात घराची किंमत लाखोंमध्ये असल्याने अनेक जण यासाठी कर्ज घेतात. तुम्ही कर्ज घेउन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. यात आम्ही तुम्हाला घर खरेदीसाठी लागणारी कागदपत्रे आणि आवश्य घेण्याची काळजी याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.

घर खरेदी करताना त्या मालमत्तेची ही कागदत्रे असणे गरजेचे
घर खरेदी करताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. यात किती आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे अनेकांना माहीत नसते. यात तुम्हाला सहकारी गृह सोसायटी असल्यास सेल डीड, शेअर सर्टिफिकेट, सेल अ‍ॅग्रीमेंट, योग्य प्राधिकरण परवानगी पत्र, ताबा मिळणे प्रमाणपत्र, अलॉटमेंट लेटर, जमिनीचा कर भरल्याची पावती, फ्लॅट खरेदीच्या पावत्या, महसूल विभागाने मंजूर केलेला मालमत्ता नकाशा,  मुखत्यारपत्र, जमिन NA प्रमाणपत्र, यूएलसी कायदा 1976 ना हरकत प्रमाणपत्र, कन्स्ट्रक्शन कॉस्ट सविस्तर तपशील, वकिल स्टँडर्ड फॉरमॅट अहवाल, सोसायटीचं ना हरकत प्रमाणपत्र, इमारतीचा मंजूर प्लॅन, घर बांधण्याची नमूद तारीख याची आवश्यता असते.

गृह कर्जासाठी लागणारी कागदपत्रे
* सर्व ख-या माहितीसह अर्जदाराची स्वक्षरी असलेला फॉर्म
* ओळखीचा पुरावा
* पासपोर्ट आकाराचे ३ फोटो
* अर्जदाकाराची बॅंकेत असलेली स्वाक्षरी पडताळणी
* बॅंकेतील मागिल ६ महिन्यांचे स्टेटमेंट
* पत्यासाठी रहिवासी पुरावा
* वडिलोपार्जी आणि वैयक्तीक मालमत्ता
* मालमत्तेचे सर्व कागदपत्र
* नोकरी करत असलेल्यांना पगाराची मुळ प्रत
* नोकरीच्या ठिकाणचा फॉर्म १६
* जर तुम्ही व्यवसायीक असाल तर ऍसेसमेंट ऑर्डरर्सच्या कॉपी
* व्यवसायीकाच्या चलन स्वरुपात ऍडवान्स पेमेंटचा पुरावा
* व्यवसाय ज्या ठिकाणी आहे त्याच्या पत्त्याचा पुरावा
* व्यवसायीकाच्या आगाऊ आयकर पेमेंटचा पुरावा

भारतीय रहिवासी नसलेल्यांसाठी कागदपत्रे
*
केवायसी पुरावा
* नोकरदारासाठी पासपोर्टसारखे नाव असलेले वेतन प्रमाणपत्र (पद, पासपोर्ट क्रमांक, जॉइनिंग डेट)
* देशात आयकर भरत असाल तर आयकर परतावा तपशील
* व्यवसायीक असल्यास त्या व्यवसायाची सर्व कागदपत्र
* पासपोर्टच्या प्रती, त्यावर निव्हासी व्हिसा असलेले आवश्यक
* रोजगाराचा पुरावा तुम्ही ज्या देशात आहात त्यातील
* भारतातील आर्किटेक्टकडून मालमत्तेचे कागदपत्र
* परदेशातील आधिच्या ६ महिन्यांचे बॅंक स्टेटमेंट
* संबंधीत व्यक्ती स्ध्या इथे नसेल तर पॉवर ऑफ ऍटर्नीचा तपशील

होम लोनसाठी केवायसीचे आवश्यक कागदपत्र
*
फोटो पुराव्यासाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी या पैकी कोणताही एक पुरावा.
* पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी.
* वयाचा पुरावा सादर करण्यासाठी पॅन कार्ड, बॅंक पासपूक, १०वी ची मार्कशीट

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Home Loan Documents Which documents are important for taking loan 07 November 2022.

हॅशटॅग्स

Home Loan Documents(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x