9 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Huhtamaki Share Price | हुहतामाकी इंडिया शेअरच्या टेक्निकल चार्टवर मजबूत ब्रेकआऊट, मिळेल 60 टक्के परतावा

Huhtamaki Share Price

Huhtamaki Share Price | आज मंगळवारी सेन्सेक्स 480 अंकांनी वधारला, निफ्टी 21700 च्या पार झाला. दरम्यान अनेक तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे लक्ष हुहतामाकी इंडिया लिमिटेड (Huhtamaki India Share Price) म्हणजेच एचआयएल कंपनीच्या शेअर्सवर होते.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचआयएल कंपनीचे शेअर्स तीन टक्के घसरणीसह 334 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. एचआयएल कंपनी मुख्यतः विविध उद्योग क्षेत्रातील ग्राहकांसाठी पॅकेजिंग उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी एचआयएल कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के घसरणीसह 321 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एचआयएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2530 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 371 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 187 रुपये होती. 25 मार्च 2022 रोजी एचआयएल कंपनीचे शेअर्स 154 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 120 टक्के वाढले आहेत. एचआयएल कंपनीची स्थापना 1935 साली झाली होती. ही कंपनी भारतीय पॅकेजिंग क्षेत्रात अग्रणी कंपनी मानली जाते.

एचआयएल कंपनीची मुख्य कंपनी असलेल्या हुहतामाकी लिमिटेडने एचआयएल कंपनीचे 67.73 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ही कंपनी मुख्यतः महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली, उत्तराखंड, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश राज्यात आपल्या उत्पादन प्रकल्पांद्वारे व्यवसाय करते. तज्ज्ञांच्या मते, एचआयएल कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत ब्रेकआउटचे संकेत देत आहे.

तज्ञांच्या मते, जर या कंपनीचे शेअर्स 374 रुपये किमतीच्या पार गेले तर शेअर 73 महिन्यांच्या कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर येईल. मंथली मूव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स इंडिकेटरवर या कंपनीच्या शेअर्सने मजबूत तेजीचा क्रॉसओव्हर बनवला आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सनुसार एचआयएल कंपनीचे शेअर्स आता कन्सोलिडेशनच्या टप्प्यातून बाहेर येत आहेत. त्यामुळे हा स्टॉक पुढील काळात 60 टक्के वाढ नोंदवू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Huhtamaki Share Price NSE Live on 13 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x