14 December 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Integra Essentia Share Price | होय खरंच! या अवघ्या 8 रुपयेच्या शेअरने 2100% परतावा दिला, आता अजून एक तुफानी बातमी

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ या FMCG क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉलकॅप कंपनीने नुकताच संपलेल्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तिमाही आधारावर 320.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 2.23 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीने 0.53 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Integra Essentia Share Price | Integra Essentia Stock Price | BSE 535958 | NSE ESSENTIA)

स्टँडअलोन आधारावर कंपनीच्या तिमाही विक्रीत 239 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत 2.11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षी 0.53 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीने 61.05 कोटी रुपये महसूल संकलित केला होता जो जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीमध्ये 17.99 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 239.36 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

2 वर्षात 2100 टक्के परतावा :
मागील 2 वर्षात ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2122 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 36 पैशांवर ट्रेड करत होते. 20 जानेवारी 2023 रोजी ‘इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 8 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. जर तुम्ही 28 जानेवारी 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 22.21 लाख रुपये झाले असते.

1 वर्षात दिला 400 टक्के परतावा :
मागील एका वर्षात ‘Integra Essentia Limited’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जानेवारी 2023 रोजी Integra Essentia कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 8.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत Integra Essentia कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price 535958 stock market live on 23 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x