14 December 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Intellect Design Share Price | अबब! मल्टिबॅगर इंटेलेक्ट डिझाईन शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, फायद्याची स्टॉक डिटेल्स सेव्ह करा

Intellect Design Share Price

Intellect Design Share Price | इंटेलेक्ट डिझाईन अरेना कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर इंटेलेक्ट डिझाईन अरेना कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तब्बल 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. (Intellect Share Price)

2023-24 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये 36 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअरची इंट्रो-डे उच्चांक पातळी किंमत 689.15 रुपयेवर पोहचली होती. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी इंटेलेक्ट डिझाईन अरेना कंपनीचे शेअर्स 19.99 टक्के वाढीसह 692.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

कंपनीची तिमाही कामगिरी :

सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंटेलेक्ट डिझाईन अरेना कंपनीने 19 टक्क्यांच्या वाढीसह 644 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील.एका वर्षापूर्वी याच तिमाहीत इंटेलेक्ट डिझाईन एरिना कंपनीने 540 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून 2023 तिमाहीत कंपनीने तब्बल 93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील गेल्या वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

शेअरची कामगिरी :

इंटेलेक्ट डिझाईन अरेना कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 601.15 रुपये किमतीवर ओपन झाले होते. काही तासात हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 689.15 रुपये इंट्रा डे उच्चांक किमतीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 692.60 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 388.65 रुपये होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60.51 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 54.70 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Intellect Design Share Price today on 29 July 2023.

हॅशटॅग्स

#Intellect Design Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x