29 April 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

IPO in Focus| ऑनलाइन सेकंड-हँड वाहन विक्रेता कंपनीचे शेअर्स 62 टक्के कमजोर, मागील वर्षी IPO आला होता, ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे का?

IPO in Focus

IPO in Focus| मागील वर्षी टेक कंपन्यांमध्ये IPO लाँच करण्याची स्पर्धा लागली होती. एकापेक्षा एक जबरदस्त दिग्गज कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सूचीबद्ध होत होते. तथापि, बहुतेक तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. अशीच कंपनी आहे जिने आपल्या शेअर धारकांची निराशा केली होती. या कंपनीचे नाव आहे, “कारट्रेड”. या टेक कंपनीचा IPO ही निराशा करणाऱ्या कंपनीच्या यादीत सामील आहे. मल्टी-चॅनल ऑटो प्लॅटफॉर्म कार ट्रेड टेक लिमिटेडचा आयपीओ मागील वर्षी 2021 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांचे 62 टक्के पेक्षा अधिक नुकसान केले आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या इश्यू किमतीपर्यंत कधीच पोहोचले नाही.

शेअर्स IPO किमतीच्या 62 टक्के खाली :
कारट्रेड कंपनीच्या IPO साठी प्रति शेअर किंमत 1,618 रुपये निश्चित करण्यात आली होती. आता हा स्टॉक 608.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच, हा स्टॉक आपल्या इश्यू किंमतीच्या तुलनेत 62 टक्के पर्यंत तुटला आहे. म्हणजेच जर तुम्ही या IPO मध्ये पैसे लावले असते, आणि त्याने आपली गुंतवणूक आतापर्यंत कायम ठेवली असती तर तुम्हाला जबरदस्त मोठा तोटा झाला असता. ज्या लोकांनी IPO मध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता कमी होऊन 37 हजारांवर आले आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये हा आयपीओ बाजारात खुला करण्यात आला होता. कारट्रेड टेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,301.60 रुपये आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 462.10 रुपये गाठली होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
CarTrade ही ऑनलाइन सेकंड-हँड वाहन विक्रेता/कार एग्रीगेटर कंपनी आहे. ऑनलाइन ऑटो क्लासिफाइड प्लॅटफॉर्म CarTrade आपल्या ग्राहकांना नवीन किंवा सेकंद हॅण्ड कार शोधण्यास आणि विकत घेण्यास मदत करते. कारट्रेड कंपनीच्या मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये वॉरबर्ग पिंकस, टेमासेक, जेपी मॉर्गन आणि मार्च कॅपिटल पार्टनर्स यांसारख्या दिग्गज संस्थाचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO in Focus of CarTrade Tech company share price return on investment on 25 October 2022.

हॅशटॅग्स

IPO in Focus(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x