11 December 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

IPO Investment | नुकताच लाँच झालेला IPO नशीब बदलतोय, कंपनीचा तपशील नीट वाचल्यास करता येईल मोठी कमाई

IPO investment

IPO Investment | तीन महिन्यांपूर्वी 24 मे रोजी शेअर बाजारात व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा शेअर सूचीबद्ध झाला होता. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 326 रुपये होती. आणि शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 4 टक्के प्रीमियम किमतीसह 337.50 रुपयांवर शेअर बाजारात लिस्ट झाला होता. त्यानंतर शेअरच्या किमतीत कमालीची वाढ पाहायला मिळाली. सध्या व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावरवर 586.65 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 11 टक्केची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती.सध्याच्या किमतीनुसार विचार केला तर गुंतवणूकदारांना इश्यू किमतीच्या तुलनेत 80 टक्के अधिक नफा मिळाला आहे. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे स्टॉकमध्ये थोडी घसरण झाली होती आणि शेअरची किंमत 545 रुपयांवर आला होता.

कंपनीला बीआयएसची मान्यता :
सकारात्मक व्यावसायिक दृष्टिकोनामुळे आणि कंपनीच्या जबरदस्त उद्योग विस्ताराच्या योजनेमुळे कंपनीचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करत आहेत. मागील दोन आठवड्यांत ह्या स्टॉकमध्ये 47 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 10 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीने जारी केलेल्या विधानात स्पष्ट केले आहे की स्टेनलेस स्टील सीमलेस आणि वेल्डेड पाईप्स आणि ट्यूबसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS ची मान्यता मिळवणारी ती पहिली भारतीय कंपनी बनली आहे.

व्हीनस कंपनीबद्दल सविस्तर :
कंपनीने जेव्हा IPO आणला होता, तेव्हाच स्पष्ट केले होते की IPO मधून उभारलेला पैसा कंपनी प्रकल्पांच्या विकासासाठी वापरणार आहे. Venus Pipes & Tubes ही गुजरात स्थित कंपनी असून स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात उद्योगात गुंतलेली आहे. Venus Pipes & Tubes कंपनी रसायने, अभियांत्रिकी, खते, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, कागद आणि तेल आणि वायू यासह विविध क्षेत्रांमध्ये व्हीनस ब्रँड नावाखाली उत्पादन आणि विपणन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment of Venus Pipes and Tubes shares price return in focus 21 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x