16 December 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

IRCTC Share Price | IRCTC शेअरबाबत मोठी बातमी! स्टॉकवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या तज्ञांचे मत आणि टार्गेट प्राईस

Highlights:

  • IRCTC Share Price
  • आयआरसीटीसी शेअरची सध्याची किंमत
  • आयआरसीटीसी कंपनी तिमाही कामगिरी
  • आयआरसीटीसी स्टॉकबाबत तज्ञांचे मत
IRCTC Share Price

IRCTC Share Price | इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेर म्हणजेच आयआरसीटीसी कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. भारतीय रेल्वेच्या मालकीच्या या PSU कंपनीने अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी सीमा कुमार यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय कमलेश कुमार मिश्रा यांच्याकडे आयआरसीटीसी पर्यटन आणि विपणन विभागाचे संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

आयआरसीटीसी शेअरची सध्याची किंमत

दरम्यान आयआरसीटीसी कंपनीच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 645.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के घसरणीसह 643.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरसीटीसी कंपनी तिमाही कामगिरी

आयआरसीटीसी कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत उत्कृष्ट नफा कमावला आहे. यासह, आयआरसीटीसीच्या संचालक मंडळाने FY23 साठी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरवर 2 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने फेब्रुवारी 2023 महिन्यामध्ये 3.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देखील जाहीर केला होता.

आयआरसीटीसी स्टॉकबाबत तज्ञांचे मत

शेअर इंडिया फर्मच्या तज्ज्ञांच्या मते पुढील काळात आयआरसीटीसी कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो. आणि शेअरची किंमत 620 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोबत तज्ञांनी 605 रुपयेवर स्टॉप लॉस लावून 727 रुपये लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या तज्ञांनी आयआरसीटीसी कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी 700 रुपयांच्या लक्ष्य किमतीसह 645-650 रुपये दरम्यान खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

Tips2trades फर्मच्या तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 604-578 रुपये किमतीपर्यंत खाली येऊ शकतो. तर स्टॉक मार्केट टुडे फर्मचे तज्ञ स्टॉक 680 रुपये ते 810 रुपये किमतीच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. मात्र तज्ञांनी 540 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IRCTC Share Price today on 5 June 2023

हॅशटॅग्स

#IRCTC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x