15 December 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार

IREDA Share Price

IREDA Share Price | भारत सरकारने गुरुवारी एक निवेदन जाहीर करून माहिती दिली की, आयआरईडीए कंपनीने गुजरातमधील GIFT सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामध्ये पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे. या कंपनीचे नाव IREDA ग्लोबल ग्रीन एनर्जी फायनान्स IFSC लिमिटेड असे ठेवण्यात आले आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

रिन्युएबल ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, 7 मे 2024 रोजी ही उपकंपनी अधिकृतपणे स्थापन करण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने IFSC गिफ्ट सिटीमध्ये वित्तीय कंपनी स्थापन करण्यासाठी NOC जारी केला आहे. शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 165.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयआरईडीए कंपनीचे एमडी प्रदीप कुमार दास यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, गिफ्ट सिटीमध्ये आयआरईडीए कंपनीच्या उपस्थितीमुळे कंपनीच्या ग्रीन फायनान्सिंगच्या नाविन्यपूर्ण कामाना चालना मिळणार आहे. या उपकंपनीच्या मदतीने आयआरईडीए कंपनीला जागतिकीकरणात स्थान निर्माण करण्यास मदत होणार आहे. आणि अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीस समर्थन देण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी कंपनीला चांगले पर्याय उपलब्ध होतील.

आयआरईडीए कंपनीच्या IFSC मध्ये प्रवेश केल्याने कंपनीसाठी नवीन संधी खुल्या होतील. कंपनीला जगभरातील ऊर्जा क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित करण्यास मदत होईल. आयआरईडीए कंपनीचा मार्च तिमाहीचा नफा 337 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरईडीए कंपनीचा शेअर नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. या शेअरची इश्यू किंमत 32 रुपये होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 3.57 टक्क्यांच्या घसरणीसह 165 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 11 May 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x