17 May 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय?
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअरने 1 वर्षात दिला 441 टक्के परतावा, स्टॉक चार्टनुसार पुढे आणखी तेजी येणार?

IRFC Share Price

IRFC Share Price | आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली आहे. आज शेअर बाजाराने नवीन आर्थिक वर्षाचे दणक्यात स्वागत केले आहे. शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहून गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. मागील एका वर्षात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक 30 टक्क्यांनी वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

बीएसई मिड कॅप निर्देशांक मागील एका आर्थिक वर्षात 65 टक्के मजबूत झाला होता. तर बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 62 टक्क्यांनी मजबूत झाला होता. याकाळात अनेक कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

ACE इक्विटी इंडेक्सच्या आकडेवारीनुसार BSE 500 इंडेक्समधील 113 कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तर 330 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सरासरी 66 टक्के नफा कमावून दिला आहे. BSE 500 निर्देशांकातील 20 कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्क्यांनी वाढवले आहे. या कंपन्यांच्या लिस्टमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स सर्वाधिक परतावा देणारे शेअर्स ठरले आहे.

आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने मागील एका आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 441 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 142.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 29 मार्च 2023 रोजी आयआरएफसी स्टॉक 26.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 2.39 टक्के वाढीसह 145.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.95 रुपयेवरून वाढून 40.47 रुपये किमतीवर पोहोचली आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 400 टक्के वाढली आहे.

आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी स्टॉक सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.50 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यासह HUDCO, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स, ज्युपिटर वॅगन्स, इंका इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 310 ते 330 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x