20 May 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

IRFC Vs RVNL Share | कभी तेजी-कभी मंदी! IRFC आणि RVNL शेअर्समध्ये नेमकं चाललंय काय? तपशील जाणून घ्या

IRFC Vs RVNL Share

IRFC Vs RVNL Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तुफान तेजीत धावत होते. आज मात्र रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. नुकताच G-20 परिषदेत अमेरिका, सौदी अरेबिया, भारत आणि युरोपियन देश एकत्र येऊन रेल्वेच्या मध्मामातून एकमेकांना जोडण्याचा विचार समोर आला आहे. या संभाव्य पायाभूत सुविधा कराराची बातमी आल्याने रेल्वे कंपन्यांचे अचानक तेजीत आले आहेत.

G-20 परिषदेत झालेल्या या करारामुळे अरब देश आणि दक्षिण आशिया यांच्यातील व्यापाराला आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. मध्यपूर्वेतील देशांना भारताशी रेल्वेने जोडणे आणि भारताला बंदराच्या माध्यमातून दुबई आणि सौदी अरेबियाशी जोडण्याबाबत या करारात विस्तृत चर्चा करण्यात आली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इरकॉन कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढीसह 159.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारी IRCON कंपनीचे शेअर्स 133.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 191.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील आठवड्यात शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 162.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 443 टक्के परतावा कमावून दिला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 32.80 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 10.03 टक्के घसरणीसह 170.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

IRFC कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 84.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच हा कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटीच्या पार गेले आहे. मागील 7 दिवसात IRFC कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे. IRFC कंपनीचे बाजार भांडवल 1.10 लाख कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबरला 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 2.18 टक्के घसरणीसह 82.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 855 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.5 टक्क्यांच्या वाढीसह 163.85 रुपये किमतीवर खरेदी विक्री होत होते. आणि राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 566 रुपये किमतीवर व्यवहार करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x