15 December 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Income Tax Notice | तुम्हाला या कारणांमुळे इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते | ही माहिती अवश्य द्या

ITR Filing Rules

ITR Filing Rules | जर तुम्ही दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरलात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. यावेळी आयटीआर दाखल करण्यापूर्वी आयकर विभागाने केलेल्या बदलांवर एक नजर टाका. आर्थिक वर्ष २०२१-२२ (करनिर्धारण वर्ष २०२२-२३) साठी प्राप्तिकर विवरणपत्र अर्ज आयकर विभागाने जारी केले असून आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.

काही अतिरिक्त माहिती देणे आवश्यक :
यावेळी आयकर विभागाकडून फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. पण काही गोष्टी बदलल्या आहेत. करदात्यांनीही प्राप्तिकर विवरणपत्र भरताना काही अतिरिक्त माहिती देणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या बदलांची माहिती नसेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करण्यात अडचण येऊ शकते.

पीएफ खात्यात करपात्र व्याज :
जर ईपीएफ खात्यात तुमचे योगदान दरवर्षी अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त योगदानावर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. तुम्हाला आयटीआर फॉर्ममध्ये ही इंटरेस्टची माहिती द्यावी लागेल.

प्रॉपर्टी खरेदी-विक्रीची माहिती :
जर तुम्ही 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीची खरेदी किंवा विक्री केली असेल तर तुम्हाला ही माहिती तारखेसह द्यावी लागेल. आयटीआर फॉर्ममध्ये तुम्हाला कॅपिटल गेन अंतर्गत खरेदी किंवा विक्रीची तारीख नमूद करावी लागेल.

घर नूतनीकरणाची माहिती :
घराच्या नुतनीकरणासाठी खर्च केला असेल तर ही माहितीही वर्षानुवर्ष द्यावी लागणार आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर येण्यासाठी हा खर्च विक्रीमूल्यातून वजा करणे आवश्यक आहे.

खरेदीचा प्रत्यक्ष खर्च :
भांडवली नफ्याची माहिती देताना तुम्हाला फक्त खर्चाचा उल्लेख करणे आवश्यक होते. पण या वेळेपासून तुम्हाला इंडेक्स कॉस्ट तसेच प्रॉपर्टी खरेदीची प्रत्यक्ष किंमत (मार्केट रेट) नमूद करावी लागेल.

निवासी स्थितीची माहिती देखील आवश्यक आहे :
आयटीआर भरताना निवासी स्थिती सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही आयटीआर-2 किंवा आयटीआर-3 फॉर्म भरत असाल तर तुम्हाला रेसिडेन्शियल स्टेटस सपोर्टचा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायात तुम्ही भारतात किती काळापासून राहत आहात, हे सांगावे लागेल.

ईएसओपीवर कर टाळण्याची माहिती :
2020 च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा करण्यात आली होती की स्टार्टअपचे कर्मचारी ईएसओपीवर कर भरणे टाळू शकतात. मात्र, त्यात काही अटी आहेत. यावेळी आयटीआर दाखल करताना कर्मचाऱ्याला डिफर्ड टॅक्सच्या रकमेचा तपशील द्यावा लागणार आहे.

विदेशातील मालमत्ता आणि उत्पन्न :
परदेशात तुमची मालमत्ता असेल किंवा तुम्ही परदेशातील एखाद्या अॅसेटमधून लाभांश किंवा व्याज मिळवले असेल तर आयटीआर भरताना ही माहिती देणं आवश्यक आहे. त्यासाठी फॉर्म-२ आणि फॉर्म-३ वापरता येतील.

मालमत्तेची माहिती :
तुम्ही देशाबाहेर कोणतीही प्रॉपर्टी विकली असेल तर आयटीआर भरताना ही माहिती द्यावी लागते. आयटीआर फायलिंगमध्ये खरेदीदाराचा आणि प्रॉपर्टीचा पत्ता द्यावा लागतो.

पेन्शनरांना पेन्शनच्या स्रोताविषयी सांगावे लागणार :
आयटीआर फॉर्ममध्ये पेन्शनधारकांना पेन्शनच्या स्रोताविषयी सांगावे लागणार आहे. पेन्शनर्सना नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट ड्रॉप-डाऊन मेन्यूमध्ये दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागेल. तुम्ही केंद्र सरकारचे पेन्शनर असाल तर पेन्शनर-सीजी निवडा, राज्य सरकारी पेन्शनर असाल तर पेन्शनर-एससी निवडा. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे पेन्शनर असतील तर पेन्शनर-पीएसयूची निवड करावी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: ITR Filing Rules need to know check details 07 July 2022.

हॅशटॅग्स

#ITR Filing Rules(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x