3 May 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

JSW Steel Share Price | 153 पट परतावा देणारा हा मल्टीबॅगर शेअर स्वस्त खरेदी करता येणार, स्टॉकची योग्य खरेदी किंमत पाहा

JSW Steel Share Price

JSW Steel Share Price | सध्या जगातील विविध देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहेत. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. त्याच वेळी असे काही स्टॉक आहेत ज्यांची विक्री करण्याचा सल्ला शेअर बाजारातील तज्ञांनी दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, जो विकून बाहेर पडण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. हा स्टॉक आहे, ‘JSW स्टील’ कंपनीचा. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, JSW Steel Share Price | JSW Steel Stock Price | BSE 500228 | NSE JSWSTEEL)

JSW स्टील कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 66,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. तथापि शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, स्टॉक होल्ड करून ठेवण्याऐवजी त्यातून सध्या बाहेर पडणे चांगले, कारण हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 24 टक्के खाली जाऊ शकतो. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकची योग्य खरेदी किंमत 550 रुपये निश्चित केली आहे. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.41 टक्के वाढीसह 757.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आणि पुढील काळात या शेअरची किंमत 24 टक्के कमी होऊ शकते, असे तज्ञांना वाटते.

जेएसडब्ल्यू स्टीलनचा परतावा :
14 डिसेंबर 2001 रोजी JSW स्टील कंपनीचे शेअर्स 4.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता शेअरची किंमत 153 पट वाढून 757.65 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे 2001 रोजी ज्या लोकांनी या स्टॉकवर 66 हजार रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1 कोटी रुपये झाले आहे. या वर्षी 19 एप्रिल 2022 रोजी JSW स्टील कंपनीचे शेअर्स 789.95 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. परंतु पुढच्या एका महिन्यातच 26 मे 2022 पर्यंत शेअरची किंमत 34 टक्क्यांनी खाली आली आणि शेअर 520.10 रुपये या आपल्या वार्षिक नीचांकी पातळीवर पोहोचले. त्यानंतर शेअरमध्ये थोडीफार खरेदी झाली आणि शेअरमध्ये 40 टक्के सुधारणा झाली आहे. परंतु बाजार तज्ञांना शेअरमध्ये पुन्हा पडझड होईल असे वाटते.

शेअरमध्ये पडझड होऊ शकते :
JSW स्टील कंपनी महाराष्ट्रातील डोलवी प्लांटद्वारे आपला व्यवसाय विस्तार करत आहे. कंपनीने डिजिटलायझेशनवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय कंपनीचे लक्ष डोलवी प्लांटच्या माध्यमातून शाश्वत व्यापार वृध्दीवर अधिक राहील. या सर्व सकारात्मक बाबी असूनही ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शेअरचे 7.5x मूल्यांकन स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत अधिक असल्याचे म्हंटले आहे. शिवाय कंपनीचा निव्वळ कर्ज/EBITDA मार्जीन देखील 2.3x वर आहे जो स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत पेक्षा खूप जास्त आहे. यामुळे ICICI ब्रोकरेज फर्मने JSE स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 550 रुपये किंमत योग्य राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JSW Steel Share Price 500228 JSWSTEEL in focus check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x