15 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

KEC International Share Price | एका सकारात्मक बातमीने केईसी इंटरनॅशनल शेअर तेजीत, शेअरमधील तेजीचा फायदा घेण्यासाठी खरेदी वाढली

KEC International Share Price

KEC International Share Price | केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 586 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केईसी इंटरनॅशनल शेअर्समध्ये बुधवारी आलेली तेजी 1,373 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर्स मिळाल्याने पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 551.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

केईसी इंटरनॅशनल विविध ऑर्डर
केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या विविध व्यवसायांमध्ये ऑर्डर मिळवल्या आहेत. केईसी इंटरनॅशनल कंपनीने रेल्वे संबंधित ऑर्डर मिळवल्या आहेत. यात ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टमसाठी सिग्नलिंग आणि दूरसंचार संबंधित ऑर्डर सामील आहेत. या कामांच्या दरम्यान 2×25 KV ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायाने भारत आणि USA मधील T&D प्रकल्पांचे काही नवीन ऑर्डर प्राप्त केल्या आहेत.

यासोबत केईसी इंटरनॅशनल कंपनीने स्पीड अपग्रेडेशन सबंधित काही ऑर्डर मिळवल्या आहेत. काही ऑर्डरमध्ये भारत आणि यूएसए मधील 400 kV ट्रान्समिशन टॉवर्स, आणि यूएस मधील टॉवर्स, हार्डवेअर आणि पोलचा पुरवठा, SAE टॉवर्सचे काम देखील सामील आहे.

केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने म्हंटले आहे की, भारतीय रेल्वे नेटवर्कची क्षमता, वेग आणि सुरक्षितता वाढवण्यावर भारत सरकार विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने केईसी इंटरनॅशनल कंपनीने ऑटोमेशनद्वारे लाइन क्षमता वाढविण्यासाठी ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंगच्या उदयोन्मुख व्यवसाय विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

KEC इंटरनॅशनल ही कंपनी मुख्यतः जागतिक पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सबंधित काम करणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी वीज पारेषण आणि वितरण, रेल्वे, नागरी, नागरी पायाभूत सुविधा, सोलर, स्मार्ट पायाभूत सुविधा, तेल आणि वायू पाइपलाइन आणि केबल्स या संबधित सेवा प्रदान करण्याचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KEC International Share Pricetoday on 15 June 2023.

हॅशटॅग्स

KEC International Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x