14 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Lotus Chocolate Company Share Price | 1 महिन्यात या शेअरने 26% परतावा दिला, रिलायन्सने कंपनी विकत घेताच खरेदीसाठी झुंबड

Lotus Chocolate Company Share Price

Lotus Chocolate Company Share Price | LOTUS Chocolate कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या (30 December 2022) ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर 122.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी LOTUS Chocolate कंपनी मध्ये गुंतवणूक केल्याची बातमी येताच शारेमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यातील गुरुवारी मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीने लोटस चॉकलेट कंपनीमधील 51 टक्के भाग भांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स रिटेल कंपनीची उपकंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने LOTUS Chocolate मध्ये 74 कोटी रुपयांमध्ये 51 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)

लोटस चॉकलेटची डील :
रिलायन्स रिटेलची उपकंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनीमधील 65,48,935 इक्विटी शेअर्स खरेदी करून त्याचा 51 टक्के भाग भांडवल वाटा ताब्यात घेतला आहे. या कंपनीच्या विद्यमान प्रवर्तक आणि प्रवर्तक गटानी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला आपला 51 टक्के हिस्सा विकला आहे. रिलायन्सने या डीलमध्ये 113 रुपये प्रति शेअर या किमतीवर एकूण 74 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. रिलायन्स कंपनीने LOTUS चॉकलेट कंपनीच्या किरकोळ शेअर धारकांना 26 टक्के शेअर्स अधिग्रणक करण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. या अंतर्गत रिलायन्स कंझ्युमर कंपनी लोटस चॉकलेट कंपनीमधील आणखी 33,38,673 इक्विटी शेअर्स खरेदी करण्याचा इच्छुक आहे.

रिलायन्स कंझ्युमर कंपनीची योजना :
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक इशा अंबानी यांनी म्हंटले आहे की, रिलायन्स कंझ्युमर कंपनी LOTUS चॉकलेटच्या अनुभवी व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे. आम्ही या कंपनीसोबत व्यवसाय वाढवण्यास इच्छुक आहोत, आणि आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. त्याचवेळी लोटसचे संस्थापक आणि प्रवर्तक अभिजित पै यांनी म्हंटले आहे की, रिलायन्स रिटेल कंपनी सोबत इतका मोठा करार करताना आम्ही खूप खुश आहोत. या गुंतवणुकीद्वारे आम्ही रिलायन्ससोबत धोरणात्मक भागीदारी करून आपला उद्योग अधिक जास्त वाढवू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शेअर्सची कामगिरी :
मागील एका महिन्यात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदाराना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक मागील पाच दिवसांत 24.89 टक्के मजबूत झाला आहे. बीएसई इंडेक्सवर सूचीबद्ध असलेल्या लोटस चॉकलेट हा स्मॉल कॅप कंपनीचे मार्केट कॅप 157.88 कोटी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Company Share Price 523475 in focus check details on 31 December 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x