12 December 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Low Price Stock | कडक! 25 रुपयाचा शेअर, प्रति दिन 5 टक्के वाढतोय, प्रचंड कमाई करून देतोय हा स्टॉक

Low Price Stock

Low Price Stock | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्या जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. Filatex Fashions ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करुन दिली आहे. मागील 7 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने चढ-उताराचे चक्र गरगर फिरत आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 400 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या शेअर्सचा सविस्तर इतिहास

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Filatex Fashion या कंपनीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा 5 टक्क्यांच्या अप्पर सर्केिटला स्पर्श करून गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. Filatex Fashions कंपनीचे शेअर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 25.60 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र व्यवहाराच्या शेवटच्या काही तासात त्यात काही प्रमाणात घट पाहायला मिळाली होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 16.30 रुपये वरून 25.40 रुपये वर पोहोचली आहे. या काळात Filatex Fashions कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

गेल्या 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर 7 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकानी हा स्टॉक 7 रुपयेवर खरेदी केला होता, त्यांना आता 250 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात 4.55 रुपयांवरून 25.40 रुपयांपर्यंत वाढ नोंदवली आहे. म्हणजेच फक्त एका वर्षात या कंपनीच्या स्टॉक किमतीमध्ये 600 टक्क्यापेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे.

चालू आर्थिक वर्षातील 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या सहामाहीत Filatex Fashion कंपनीने 81.59 कोटी रुपये महसूल कमावला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 472 टक्क्यांनी जास्त आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Filatex कंपनीने 14.24 कोटी रुपये महसूल कमावला होता. कर कपातीनंतर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Filatex कंपनीने 4.60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत Filatex Fashions कंपनीने 0.6 कोटी रुपये निव्वळ नफा संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Low Price Stock of Filatex Fashions share price Return on investment on 18 November 2022.

हॅशटॅग्स

Low Price Stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x