15 December 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

MamaEarth IPO | या कंपनीत बॉलिवूड कलाकारांची गुंतवणूक, IPO बाजारात लाँच होतोय, या आयपीओत पैसे गुंतवावे का?

MamaEarth IPO

MamaEarth IPO | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फक्त निराशाजनक राहिले आहे. झाले गेले विसरून जा! आज या लेखात आम्ही तुम्हाला एका विशेष कंपनीच्या IPO बद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही सध्या IPO मध्ये गुंतवणुक केण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. लवकरच शेअर बाजारात एका मोठ्या ब्रँड कंपनीचा IPO लाँच होणार आहे. ममाजअर्थ या पर्सनल केअर ब्रँडची मूळ कंपनी असेलल्या होन्सा कंझ्युमर लिमिटेडने IPO साठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा म्हणजेच RHPD मसुदा सादर केला आहे. या इश्यूमध्ये कंपनी 46.82 दशलक्ष शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विक्री करणार आहे. याशिवाय 400 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स कंपनी खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Honasa Consumer Share Price | Honasa Consumer Stock Price)

ममाजअर्थ कंपनीचे संस्थापक वरुण अलघ आणि गझल अलघ हे OFS अंतर्गत आपला कंपनीमधील हिस्सा IPO मध्ये विकणार आहे. सोफिना, फायरसाइड व्हेंचर्स, इव्हॉल्व्ह इंडिया, स्टेलारिस सारखे गुंतवणूकदारही आपले भागभांडवल या IPO mashe विकणार आहेत. एंजल इंवेस्टर कुणाल बहल, ऋषभ मारीवाला, रोहित बन्सल आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा हे देखील आपले शेअर्स खुल्या बाजारात विक्रीसाठी जारी करणार आहेत.

कंपनीबद्दल थोडक्यात :
ममाजअर्थ या ब्रँडची मूळ कंपनी होन्सा कंझ्युमरने एप्रिल-सप्टेंबर 2022 या तिमाहीत 3.67 कोटी रुपये नफा कमावला होता, आणि त्यावेळी त्यांनी 722.73 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात कंपनीने 943.46 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि 14.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. होन्सा कंझ्युमर या ममाजअर्थ ब्रँड चालवणाऱ्या कंपनीच्या तुलनेत The Derma Co आणि BBlunt सारखे ब्रँड चालवणाऱ्या कंपनीचे बाजार भांडवल 1.2 अब्ज डॉलर्स आहे. होन्सा कंझ्युमर या ममाजअर्थ ब्रँड चालवणाऱ्या कंपनी कंपनीने 2022 वर्षाच्या सुरुवातीला एक फंड राऊंडमध्ये भांडवल उभारणी केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MamaEarth IPO is ready to list Honasa Consumer Share Price check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

MamaEarth IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x