4 May 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

Mazagon Dock Shipbuilders Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक गुंतवणुकदारांना श्रीमंत करतोय, शेअरची कामगिरी जाणून घ्या

Highlights:

  • Mazagon Dock Shipbuilders Share Price
  • मागील एका महिन्यात 34.79 टक्के परतावा दिला
  • जर्मन कंपनी सोबत नवीन करार
  • शेअरची सध्याची किंमत
Mazagon Dock Shipbuilders Share Price

Mazagon Dock Shipbuilders Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या पाणबुडी बनवणाऱ्या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आली आहे. ही कंपनी लवकरच एका जर्मन कंपनीच्या सहकार्याने 6 डिझेल पाणबुड्याची निर्मिती करणार आहे.

मागील एका महिन्यात 34.79 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 34.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,074.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर्मन कंपनी सोबत नवीन करार

बदलत्या जागतिक राजकारणात आणि वैश्विक परिस्थितीत भारताची भूमिका खूप महत्वपूर्ण बनली आहे. चीन विरुद्धच्या लढाईत पश्चिमात्य देश भारताकडे विशेष स्थान म्हणून पाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून एका प्रसिद्ध जर्मन कंपनीने भारतीय कंपनी मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत हा नवीन करार केला आहे.

मझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत करार करणाऱ्या या जर्मन कंपनीचे नाव Thyssenkrupp AG असे आहे. या दोन्ही कंपन्या सोबत 6 डिझेल पाणबुड्या निर्मिती करणार आहेत. या विषयावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरच याची अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

शेअरची सध्याची किंमत

आज माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.34 टक्क्यांच्या वाढीसह 1019 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 27.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षभरापूर्वी माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 282.83 टक्के वाढले आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1062 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News| Mazagon Dock Shipbuilders Share Price Today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Shipbuilders Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x