14 December 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Multibagger Stocks | मोठी संधी! मागील 1 महिन्यात अ‍ॅडव्हान्स लाइफस्टाइल शेअरने 45% परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहेत.

अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 6 ऑक्टोबर 2023 हा दिवस जाहीर केला होता. आता त्यात बदल करून कंपनीने रेकॉर्ड तारीख 13 ऑक्टोबर 2023 निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अॅडव्हान्स लाइफस्टाइल स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 112.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तिमाही निकाल तपशील
मार्च 2023 च्या तिमाहीत अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीने 1.61 कोटी रुपये निव्वळ कमाई केली होती. तर जून 2023 तिमाहीत कंपनीने 0.10 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न नोंदवले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा निव्वळ खर्च 0.07 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा निव्वळ खर्च 1.51 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा EBITDA 0.10 कोटी होता. जून तिमाहीत कंपनीच्या EBITDA 0.03 कोटी रुपये नोंदवला गेला होता. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीचा EPS तिमाही दर तिमाही 0.32 वरून 0.08 वर घसरला आहे. आणि कंपनीचा निव्वळ नफा मार्च तिमाहीत 0.10 कोटी रुपयेवरून 0.02 कोटीवर आला आहे.

शेअर्सची कामगिरी
मागील एका महिन्यात अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 2023 या वर्षात अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीचे शेअर्स 133 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 206 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Advance Lifestyles share price 05 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x