12 December 2024 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
x

My EPF Money | नोकरदारांसाठी EPFO अलर्ट, पैसे गमावून बसाल, ईपीएफओ हे काम कधीच करत नाही

My EPF Money

My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या 6 कोटींहून अधिक सदस्यांना सतर्क केले आहे. पीएफ म्हणून कपात केलेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम ईपीएफओ व्यवस्थापित करते. तुम्हीही ईपीएफओचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ‘ईपीएफओ’ने आपल्या सदस्यांना सायबर क्राइमबाबत सतर्क केले आहे. सायबर गुन्हेगार ईपीएफओच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सदस्यांना फोन करून त्यांची वैयक्तिक माहिती विचारत आहेत.

ईपीएफओ हे करत नाही
ईपीएफओने ट्विट केले- ‘फेक कॉल आणि एसएमएसपासून सावध राहा. ईपीएफओ आपल्या सदस्यांना कधीही फोन, ई-मेल किंवा सोशल मीडियावर वैयक्तिक तपशील सामायिक करण्यास सांगत नाही. ईपीएफओ आणि त्याचे कर्मचारी अशी माहिती कधीच मागत नाहीत. ईपीएफओने आपल्या सदस्यांना त्यांच्या यूएएन, पॅन, पासवर्ड, बँक खात्याची माहिती, ओटीपी, आधार आणि आर्थिक तपशील कोणालाही शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. सायबर गुन्हेगार ईपीएफओ सदस्यांच्या व्यक्तीचा तपशील बेकायदेशीरपणे वापरू शकतात आणि सदस्यांना आर्थिक नुकसानीस देखील सामोरे जावे लागू शकते.

ईपीएफ म्हणजे काय :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही एक सेवानिवृत्ती योजना आहे. याचे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) करते. ईपीएफ योजनेत कर्मचारी आणि त्याची कंपनी दरमहा समान रक्कम देतात. हे कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के आहे. सरकारने या आर्थिक वर्षासाठी ईपीएफमधील ठेवींवर ८.१ टक्के व्याजदर निश्चित केला आहे.

काय आहे व्याजदर :
मार्च महिन्यात सरकारने पीएफच्या ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणला होता. हा जवळपास 40 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे. १९७७-७८ मध्ये ईपीएफओने ८ टक्के व्याजदर निश्चित केला होता. पण त्यानंतर तो सातत्याने ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक होत आहे. कर्मचाऱ्याच्या पगारावर १२ टक्के वजावट ईपीएफ खात्यासाठी असते. मालकाने केलेल्या वेतन कपातीपैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस कर्मचारी पेन्शन योजनेला आणि ३.६७ टक्के रक्कम ईपीएफला मिळते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: My EPF Money alert from EPFO department check details on 28 December 2022.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x