19 April 2024 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

PB Fintech Share Price | होय खरंच! 68% स्वस्त झालेला शेअर म्युच्युअल फंड कंपन्या खरेदी करत आहेत, हे स्टॉक मालामाल करणार?

PB Fintech Share Price

PB Fintech Share Price | गेल्या तीन वर्षापासून भारतीय शेअर बाजार काही प्रमाणत अस्थिर पाहायला मिळाला. आणि मागील दोन वर्षांत अनेक न्यू एज टेक कंपन्यांनी आपले आयपीओ बाजारात लाँच केले, आणि त्यातील बरेच हिट झाले, तर काही फ्लॉप ही झाले आहेत. न्यू एज टेक कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू 20 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घटली आहे, आणि दुसरीकडे देशातील टॉप म्युच्युअल फंड हाऊसनी या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. खरेतर फ्रँकलिन टेम्पलटन कंपनीने पॉलिसी मार्केट ऑपरेटर म्हणून ओळखली जाणारी कंपनी म्हणजेच ‘पीबी फिनटेक’ आणि ‘डेल्हीवरी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PB Fintech Share Price | PB Fintech Stock Price | BSE 543390 | NSE POLICYBZR)

फ्रेंकलिन टेम्पलटनचे स्पष्टीकरण :
आम्ही न्यू एज टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर अधिक फोकस करत आहोत, कारण त्यांचे बाजार मूल्यांकन रीसेट केले गेले आहे”. फ्रँकलिन टेम्पलटन फर्मच्या इंडिया युनिटमधील तज्ञांनी एका रिपोर्टमध्ये न्यू एज टेक कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे कारण म्हंटले होते की, न्यू एज टेक कंपन्यांचा बिझनेस मॉडेलबद्दल डेटा उपलब्ध आहे, त्यामुळे यात गुंतवणूक अधिक फायद्याचे आहे. 2021 मध्ये भारतीय इंटरनेट कंपन्यांच्या सुरुवातीच्या IPO मध्ये वाढ झाली, कारण साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या, आणि पैशाचे धोरण, स्टार्टअपला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक प्रयत्न केले. काही न्यू एज टेक कंपन्या आता चांगली कामगिरी करत आहेत, आणि पुढील काळात ते नफा कमावण्याच्या ट्रॅक वर परततील, असे संकेत मिळत आहेत.

फ्रँकलिन टेम्पलटन या जागतिक गुंतवणूक संस्थेद्वारे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या गुंतवणूक फंडने नोव्हेंबर 2022 मध्ये ई-कॉमर्स लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवरी लिमिटेड’ मध्ये3.3 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आणि ऑनलाइन विमा मार्केटप्लेस पॉलिसीबझारची ऑपरेटर कंपनी ‘पीबी फिनटेक लिमिटेड’ चे 2 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. डेल्हीवरी लिमिटेड आणि पीबी फिनटेक व्यतिरिक्त फ्रँकलिन टेम्पलटन या जागतिक गुंतवणूक संस्थेने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम कंपनी, ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो लिमिटेड, आणि नायका कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून गुंतवणूक केली आहे. या न्यू एज टेक कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पेटीएम कंपनीच्या शेअर धारकांना सर्वात जास्त फटका बसला आहे. पेटीएम कंपनीचे मार्केट कॅप 12.7 अब्ज डॉलर्सने घटले आहे. पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीपासून 68 टक्के कमजोर झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PB Fintech Share Price 543390 POLICYBZR in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x