15 December 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

PB Fintech Share Price | पीबी फिनटेक शेअर मालामाल करतोय, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून गुंतवणूक करा, फायदा होईल

PB Fintech Share Price

PB Fintech Share Price | पीबी फिनटेक या पॉलिसी बाजारच्या पॅरेंट कंपनीच्या शेअर्सने सोमवारी जबरदस्त तेजी नोंदवली होती. आज देखील शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 708 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 7.52 टक्क्यांच्या वाढीसह 698.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (PB Fintech Share)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 649.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के (PB Fintech Share Price NSE) वाढीसह 724.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीपासून 100 टक्के वाढले आहेत. सध्या PB Fintech स्टॉक अपट्रेंडमध्ये ट्रेड करत आहे. पीबी फिनटेक या पॉलिसी बाजारच्या मूळ कंपनीचे शेअर्स 17 नोव्हेंबर 2022 रोजी 356.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनांक 26 जून रोजी हा स्टॉक 708 रुपये उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 5 महिन्यांत पीबी फिनटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे.

पीबी फिनटेक कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन विक्रमी उच्चांक किंमत 1470 रुपये होती. 17 नोव्हेंबर 2021 रोजी पीबी फिनटेक कंपनीचे शेअर्स 1470 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे IPO शेअर्स 980 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. तर PB Fintech कंपनीचे शेअर्स 1150 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

पीबी फिनटेक ही विमा आणि कर्ज सेवा देणारी एक आघाडीची ऑनलाइन कंपनी आहे. पीबी फिनटेक ही कंपनी पॉलिसीबझार आणि पैसाबाजार प्लॅटफॉर्मचार व्यवसाय हाताळते. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत पीबी फिनटेक कंपनीने 43.39 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि तयय कंपनीने 29.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PB Fintech Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

PB Fintech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x