12 December 2024 3:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Penny Stocks | 35 पैसे वर ट्रेड करणारा स्टॉक पोहोचला 10 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, आजही खरेदीला स्वस्त

Penny stocks

Penny Stocks | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जात कारण कधी पडेल आणि कधी वाढेल सांगता येत नाही म्हणून हुशारीने गुंतवणूक करा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल नी चांगला परतावा मिळवायचा असेल, तर पेनी स्टॉक ही एक जोखमीची गुंतवणूक असू शकते कारण ती एक धोकादायक गुंतवणूक आहे हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. शेअर मार्केट चा आणखी एक फंडा म्हणजे जिथे जास्त जोखीम, तिथे नफाही जास्त.

3 महिन्यांत 22 पट वाढला :
आता आम्ही अशा एका पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने केवळ 3 महिन्यांत 22 पट वाढला असून आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा दिला आहे. वास्तविक हा पेनी स्टॉक आहे राज रेयॉन कंपनीचा. राज रेयोन जो मागील तीन महिन्यांपूर्वी 35 पैशाना ट्रेड करत होता. या स्टॉक ने अवघ्या 3 महिन्यांत 2171.43 टक्के परतावा दिला आहे. NSE वर राज रेयोन कंपनीचा स्टॉक 35 पैशांवर ट्रेड करत होता, जो आता 10.5 रुपयांवर पोहोचला आहे. नक्कीच ज्या गुंतवणूकदारांनी शेअर होल्ड केले आहेत त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे.

राज रेयॉनने किती परतावा दिला :
राज रेयॉनच्या शेअर मध्ये जर तुम्ही तीन महिन्यापूर्वी एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आता 22 लाख 71 हजार रुपये मुनाफा परतावा भेटला असता. जवळजवळ 130% नफा मिळाला असता. जर तुम्ही एक महिन्यापूर्वी एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आता तुम्हाला 230430 रुपये नफा झाला असता. एक आठवड्यापूर्वी गुंतवणूक केली असती वर 1 लाख रुपयेची गुंतवणूक आज 12,5200 रुपये झाली असती. एका आठवड्यात कंपनी ने जवळपास 25% परतावा दिला आहे.

कंपनीच्या कामगिरीचे निरीक्षण :
राज रेयॉन या पेनी स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या कामगिरीचे निरीक्षण केल्यास मागील एका वर्षात, त्याची ट्रेडिंग किंमत कमाल 7.95 रुपये आणि किमान 1.35 रुपये आहे. एका वर्षात, या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 3,875 टक्के परतावा दिला असे चार्ट वरून दिसते. म्हणजे एका वर्षात त्याच्या स्टॉकने एक लाख रुपये गुंतवणुकीवर 39 लाख 75 हजार रुपयांचा परतावा दिला आहे आणि गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्याच वेळी, स्टॉकने मागील तीन वर्षांपूर्वी केलेल्या एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 79 लाख 50 हजार रुपयांचा नफा दिला आहे.

पेनी स्टॉक म्हणजे काय?
पेनी स्टॉकची मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवल इतर स्टॉकच्या तुलनेत खूपच कमी आहे. सामान्यत: 10 रुपयांपेक्षा कमी बाजारभाव वर ट्रेड करत असलेल्या शेअर ला पेनी स्टॉक म्हणतात. त्यांचा मार्केट कॅप खूप कमी असतो आणि शेअर किमतीत वेगाने चढ-उतार होतात. त्याच्या भागधारकांची संख्याही खूप कमी असते. म्हणून पेनी स्टॉक मध्ये विचार करून पैसे गुंतवा जेणेकरून नुकसान होणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Penny Stocks Raj Rayon Share Price return as in 19 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x