4 May 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

Praj Industries Share Price | गुंतवणूकदारांना 11795 टक्के परतावा देणाऱ्या प्राज इंडस्ट्रीज शेअरवर मोठी टार्गेट प्राईस, फायदा घेणार का?

Praj Industries Share price

Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज या दिग्गज जैवइंधन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. अवघ्या चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तर करोडपती बनवले आहे. (Praj Share Price)

ब्रोकरेज फर्मच्या मते पुढील काळात हा स्टॉक आणखी वाढू शकतो. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक आणखी 23 टक्क्यांनी वाढू शकतो. मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 408 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.88 टक्के वाढीसह 406.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

11 जुलै 2003 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11795 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 408 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 461.50 रुपये या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांच्या घसरणीसह 299 रुपये या नीचांकी किंमत पातळीवर पोहोचले होते.

पुढील काळात इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून प्राज इंडस्ट्रीज कंपनीला याचा खूप फायदा होणार आहे. प्राज इंडस्ट्रीज आणि इंडियन ऑइल यांच्यात एक व्यापारी करार झाला असून याअंतर्गत देशातील जैवइंधन उत्पादनाची क्षमता वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे. या कराराबाबत इंडियन ऑइल कंपनीने 2046 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

प्राज इंडस्ट्रीज कंपनी सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, झिरो लिक्विड डिस्चार्ज, आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स या विभागामध्ये देखील स्थान मजबूतीचा प्रयत्न करत आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर 500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praj Industries Share price today on 15 July 2023.

हॅशटॅग्स

Praj Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x