15 December 2024 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई

Highlights:

  • RattanIndia Enterprises Share Price – रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनी अंश
  • नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली
  • श्रीलंकेच्या बाजारपेठेत प्रवेश
  • 120 टक्के CAGR दराने वाढ
  • मागील 5 वर्षात 1400% परतावा दिला
RattanIndia Enterprises Share Price

RattanIndia Enterprises Share Price | रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.3 टक्के वाढीसह 84.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीच्या उपकंपनीने नवीन ई-बाईक लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. (रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनी अंश)

नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली
रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी रिव्हॉल्ट इंटेलिकॉर्प प्रायव्हेट लिमिटेडने नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली आहे. आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 80.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्रीलंकेच्या बाजारपेठेत प्रवेश
16 सप्टेंबर 2024 रोजी रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीची उपकंपनी Revolt Motors ने Evolution Auto Pvt Ltd सह भागीदारी करून श्रीलंकेच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची घोषणा केली होती. कोलंबो ईव्ही एक्स्पोमध्ये यशस्वी प्रक्षेपण आणि स्थानिक लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर रिव्हॉल्ट कंपनीने देशव्यापी व्यवसाय विस्ताराच्या योजनांसह कोलंबोमध्ये नवीन ई-बाईक लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. रिव्हॉल्ट कंपनीच्या ई-बाइक्स त्यांच्या AI- सक्षम तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत. रिव्हॉल्ट कंपनीने 2029 पर्यंत श्रीलंकेत 90 डीलरशिप शोरूम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. पुढील चार महिन्यांत ही कंपनी 15 डीलरशिप शोरूम सुरू करेल.

120 टक्के CAGR दराने वाढ
रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीच्या शेअर्सचा ROE 76 टक्के आणि ROCE 36 टक्के असून एकूण बाजार भांडवल 11,265.50 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 120 टक्के CAGR दराने वाढले आहे. रतनइंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर 48.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 75.4 टक्के मजबूत झाला आहे.

मागील 5 वर्षात 1400% परतावा दिला
मागील पाच वर्षात रतनइंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या काळात शेअरची किंमत तब्बल 1400 टक्के वाढली आहे. रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 94.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी. 48.45 रुपये होती.

Latest Marathi News | RattanIndia Enterprises Share Price 19 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

RattanIndia Enterprises Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x