13 December 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 23 रुपये, अवघ्या 9 महिन्यात पैसा दुप्पट झाला, नवीन वर्षात शेअर वाढेल?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 9 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अवघ्या 9 महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 रुपयेवरून वाढून 23 रुपये किमतीवर पोहचली आहे.

28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 9.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2023 या वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 1 टक्क्यांच्या घसरणीसह 22.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज 1 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.93 टक्के वाढीसह 23.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 25.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. रिलायन्स पॉवर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8540 कोटी रुपये आहे. 10 जुलै 2023 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर पोहचले होते. तर 30 ऑगस्ट 2023 या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2023 या महिन्यात रिलायन्स पॉवर स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता.

एकेकाळी भारतातील नाही तर पूर्ण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पंक्तीत बसणाऱ्या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीला दिवाळखोरीचा देखील सामना करावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या सौरऊर्जा आणि दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनाही फारसे यश मिळू शकले नाही.

आता त्यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. मागील एका वर्षात सेन्सेक्स निर्देशांक 17.40 टक्के वाढला होता. तर रिलायन्स पॉवर स्टॉक जवळपास दुप्पट झाला होता. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 01 January 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x