12 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर या अनिल अंबानींच्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. सोमवारी रिलायन्स पॉवर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 23.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 1 रुपयेपर्यंत खाली आले होते. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.16 टक्के वाढीसह 23.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील काही वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कर्ज सेटलमेंटसाठी रिलायन्स पॉवर कंपनी आणि तिची प्रवर्तक कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 14 मार्च 2024 रोजी ICICI बँक सोबत एक करार केला होता. रिलायन्स पॉवर कंपनीच्या कर्जाशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत.

या करारानंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये देखील जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 237.25 रुपये किमतीवर पोहचले होते. तर सोमवारी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 247.10 रुपये किमतीवर पोहोचला होता.

16 मे 2008 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 260.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण सुरू झाली होती. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर आले होते. मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.

18 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 23.23 रुपये किमतीवर पोहोचले होते. अवघ्या 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1955 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x