15 December 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 28.50 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील 15 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.17 टक्के वाढीसह 28.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या कर्जाची परतफेड करायला सुरुवात केली आहे. रिलायन्स पॉवर कंपनी कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि बीएस बँकेचे थकबाकी असलेले कर्ज निकाली काढल्याची घोषणा केली होती. त्यानंतर स्टॉक तेजीत वाढायला सुरुवात झाली होती.

रिलायन्स पॉवर कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांनी आपली उपकंपनी Kalai Power Pvt Ltd आणि Reliance Cleangen Ltd कंपनीवरील कर्ज सेटलमेंट करण्यासाठी RCFL आणि Authum Investment and Infrastructure Ltd फर्मसोबत कर्ज सेटलमेंट आणि डिस्चार्ज करार संपन्न केला आहे. आतापर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीने 1023 कोटी रुपये कर्ज परतफेड केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. सध्या या कंपनीवर फक्त आयडीबीआय बँकेचे कर्ज शिल्लक आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 9.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 28 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 28.50 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2420 टक्के वाढवले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उचांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 29 March 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x