12 December 2024 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा
x

Remus Pharmaceuticals IPO | रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचा धमाकेदार IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, पैसे तयार ठेवा

Remus Pharmaceuticals IPO

Remus Pharmaceuticals IPO | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा काळात अनेक कंपन्या आपले IPO शेअर बाजारात लाँच करत आहेत. यात गुंतवणूक करून तुम्ही मजबूत कमाई करू शकता.

रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी आपला IPO 17 मे ते 19 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. कंपनीने आपल्या IPO द्वारे 47.69 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील कंपनीच्या स्टॉकला मजबूत प्रतिसाद मिळत आहे.

IPO तपशील :
रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO अंतर्गत शेअरची किंमत बँड 1,150 रुपये ते 1,229 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. कंपनी एका लॉटमध्ये 100 शेअर्स जारी करणार आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1,22,900 लाख रुपये जमा करावे लागणार आहे.

ग्रे मार्केट कामगिरी :
रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या IPO ला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ग्रे मार्केटमध्ये हा IPO स्टॉक 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ प्रत्येक शेअरवर गुंतवणुकदारांना 100 रुपये नफा मिळू शकतो. या प्रकरणात, स्टॉक 1,329 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी 2015 मध्ये स्थापन झाली होती. ही कंपनी मुख्यतः औषधांच्या तयार फॉर्म्युलेशनचे विपणन आणि वितरण करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ही कंपनी Active Pharmaceutical Ingredients मध्ये देखील व्यवहार करते. रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीचे ग्राहक 20 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरले आहेत. 31 जानेवारी 2023 पर्यंत कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये 429 उत्पादने सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Remus Pharmaceuticals IPO today on 17 May 2023.

हॅशटॅग्स

Remus Pharmaceuticals IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x