Sarkari Penny Share | 29 रुपयांच्या सरकारी पेनी शेअरची 14 टक्के उसळी, आजही अप्पर सर्किट, शेअर खरेदीसाठी तुंबळ गर्दी
Sarkari Penny Share | सरकारची मालकी असलेल्या MTNL या दूरसंचार कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स इंट्राडे ट्रेडमध्ये 14.20 टक्क्यांची वाढीसह 29.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवारी देखील एमटीएनएल शेअरने 4.49% टक्क्यांची उसळी घेतली असून तो सध्या 29.1 रुपयांवर ट्रेड करत आहेत.. गेल्या पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.53 टक्के वाढली आहे. MTNL कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 40.85 रुपये आहे. तर 20/06/2022 रोजी MTNL कंपनीच्या शेअरने 16.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mahanagar Telephone Nigam Share Price | Mahanagar Telephone Nigam Stock Price | BSE 500108 | NSE MTNL)
MTNL शेअर्समध्ये अचानक तेजी :
केंद्र सरकारने BSNL कंपनीला आर्थिक मदत करण्यासाठी 1 लाख 64 हजार कोटी रुपयांचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, BSNL ला आर्थिक पॅकेज दिल्यामुळे भारतीय संचार निगमचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल. वैष्णव यांनी माहिती दिली की, BSNL लवकरच स्वदेशी 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित करणार आहे. पंतप्रधानानी जाहीर केलेल्या मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत भारतातील दूरसंचार अभियंत्यांनी 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित केले आहे. आपल्या देशात 4G आणि 5G तंत्रज्ञान विकसित होत आहे, ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. यासोबतच भारत सरकार MTNL कंपनीलाही प्रोत्साहन देणार आहे. भारत सरकारने BSNL आणि MTNL या कंपनीच्या विलीनीकरणाला पूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे BSNL ला दिल्या जाणाऱ्या आर्थिक पॅकेजचा फायदा MTNL लाही मिळणार आहे.
BSNL/MTNL कंपनीचा तोटा :
BSNL/MTNL कंपनीला स्थापनेपासून आतपर्यंत 73,000 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. BSNL ने स्थापनेपासून 57,671 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे , तर MTNL ला मार्च 2022 पर्यंत 14,989 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार या दूरसंचार कंपनीच्या तोट्यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारावर होणारा खर्च, बाजारातील स्पर्धा आणि कंपनीवरील कर्जाचा बोजा हे घटक कारणीभूत आहे. आता या कंपन्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. 2019 मध्ये भारत सरकारने BSNL आणि MTNL साठी पुनरुज्जीवन पॅकेज आणि काही महत्वाचे निर्णय जाहीर केले होते. या पॅकेजमध्ये VRS योजना, गॅरंटी बॉण्ड्स, प्रशासकीय कर्ज पुनर्गठन द्वारे कर्मचारी खर्च कपात यांचा समावेश आहे. सध्या भारत सरकारने BSNL आणि MTNL कंपनीला पुन्हा जिवंत करण्यासाठी कॅपिटल इन्फ्युजनद्वारे 4G सेवांसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यावर तसेच कोर अँड नॉन-कोअर मालमत्तेचे मुद्रीकरण, BSNL आणि MTNL च्या विलीनीकरणाची तत्वतः मान्यता असे निर्णय घेतले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Sarkari Penny Share BSNL and MTNL company will get Financial package from Indian government details on 16 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News