29 March 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

SBI FD Vs Post Office TD | बँक एफडी विरुद्ध पोस्ट ऑफिस टाइम डीपोजिट योजना, पैसे कुठे अधिक मिळतील पहा, फायद्यात राहा

SBI FD Vs Post Office FD

SBI FD Vs Post Office FD | भारतातील सर्वात मोठी बँक SBI ने नुकताच FD च्या व्याजदरात वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही SBI मध्ये एफडी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आधी पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट स्कीम बद्दल जाणून घेतले पाहिजे. आज या लेखात आम्ही तुम्हाला SBI फिक्स्ड डिपॉझिट आणि पोस्ट ऑफीसच्या टाइम डिपॉझिट स्कीम बद्दल माहिती देणार आहोत, जेणे करून तुम्हाला गुंतवणूक करून जास्त फायदा मिळवता येईल.

टाइम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. ही फक्त एक प्रकारची एफडी योजना आहे. यामध्ये तुम्ही ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करून निश्चित व्याज दराने परतावा कमवू शकता. टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 5.5 ते 6.7 टक्के परतावा मिळू शकतो. या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपये जमा करावे लागेल. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

पैसे दुप्पट होण्याचा कालावधी : 

पोस्ट ऑफीस टाइम डिपॉझिट :
यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 6.7 टक्के व्याज परतावा मिळू शकतो. त्यामुळे फॉर्मुला-72 नुसार, जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी 10 वर्षे 7 महिने इतका कालावधी लागेल.

SBI FD :
या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमाल 6.25 टक्के व्याज परतावा मिळू शकतो. त्यामुळे फॉर्मुला-72 नुसार, जर तुम्ही या योजनेत पैसे लावले तर तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी 11 वर्षे आणि 6 महिने इतका कलावधी लागेल.

गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय :
जर तुम्ही अल्पवधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर म्हणजे 1, 2 किंवा 3 वर्षांसाठी तर SBI च्या FD मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहील. कारण या अल्प कालावधीत FD वर टाइम डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज परतावा मिळतो. दुसरीकडे, जर तुम्हाला 5 वर्ष किंवा जास्त कालावधी साठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफीसच्या TD योजनेत गुंतवणूक करू शकता.

फॉर्मुला-72 नुसार गुंतवणूक :
गुंतवणूक विषयक हा एक खास फॉर्मुला तज्ञांनी तयार केला आहे. फॉर्मुला-72 हा गुंतवणुकीसाठी सर्वात अचूक नियम असल्याचे तज्ञ मानतात. या फॉर्मुलाद्वारे ठरवले जाते की तुमची गुंतवणूक किती वर्षात दुप्पट होईल. समजा तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीवर वार्षिक 8 टक्के व्याज परतावा मिळतोय. अशा परिस्थितीत, तुम्हाला फॉर्मुला-72 च्या नियमानुसार 72 भागीले 8 केल्यास तुम्हाला किती वर्षात दुप्पट परतावा मिळेल हा कालावधी भेटेल. 72/8 = 9 वर्षे, म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SBI FD and Post Office TD scheme for investment and huge returns on 15 November 2022.

हॅशटॅग्स

SBI FD Vs Post Office FD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x