16 December 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SBI FD Interest | वरिष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! SBI बँकेच्या या 5 FD योजना माहित आहेत? फक्त फायदाच फायदा - Marathi News

Highlights:

  • SBI FD Interest
  • SBI अमृत वृष्टी
  • SBI अमृत कलश
  • SBI वीकेवर
  • SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट
  • SBI सर्वोत्तम
SBI FD Interest

SBI FD Interest | फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हा ऑप्शन गुंतवणूकदारांसाठी अतिशय चांगला ऑप्शन आहे. एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. आज आम्ही तुम्हाला वरिष्ठ नागरिकांसाठी एसबीआय अंतर्गत कोण कोणत्या स्कीम राबवल्या जातात त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. अनेक व्यक्ती एसबीआयच्या या 5 स्कीमचा लाभ घेताना पाहायला मिळतात.

एसबीआय बँक एफडीवर चांगल्या व्याजदरासह सुरक्षा देखील प्रदान करते. म्हणजेच तुमचे गुंतवणुकीचे पैसे इतर कोणीही काढून घेऊ शकत नाही. चांगली सुरक्षा असल्यामुळे आणि सरकारी बँक असल्यामुळे अनेकांना एसबीआयच्या स्कीममध्ये पैसे गुंतवायला फायद्याचे वाटते.

1) SBI अमृत वृष्टी :
या योजनेची सीमा 2025 पर्यंत असून 31 मार्चपर्यंत लाभ घेता येणार आहे. ‘एसबीआय अमृत वृष्टी’ या योजनेमध्ये तुम्हाला 444 दिवसांच्या जमा केलेल्या पैशांवर चांगले व्याजदर मिळते. 7.25%ने व्याजदर देत वरिष्ठांसाठी खुशखबर आहे. वरिष्ठ नागरिकांना 0.50% ने आगाऊ व्याजदर मिळते.

2) SBI अमृत कलश :
एसबीआय अमृत कलश योजना वरिष्ठ नागरिकांसह एनआरआय आणि घरामध्ये असलेल्या व्यक्तींसाठी आहे. योजना फक्त 400 दिवसांची असून 12 एप्रिल 2023 सालापासून 7.10%ने व्याजदर प्रदान करते. महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठ नागरिकांसाठी 7.60% एवढ्या व्याजदराचा पर्याय दिला गेला आहे. ही योजना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.

3) SBI वीकेवर :
एसबीआय वीकेअर एफडी ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून वरिष्ठांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. या योजनेमध्ये वरिष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरापेक्षा 50 आधार अंक bps तर्फे अधिक व्याजदर मिळणार आहे.

4) SBI ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट :
ही योजना देखील वरिष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिक डिपॉझिट पिरियडनुसार 7.40% टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम कमवू शकतात. ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट या योजनेमध्ये 1777 किंवा 1111 दिवसांसाठी 6.65% व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर 2222 दिवसांसाठी 6.40% व्याजदर मिळेल.

5) SBI सर्वोत्तम :
या योजनेमध्ये सामान्य व्याजदरापेक्षा जास्त रक्कम कमावता येऊ शकते. फिक्स डिपॉझिटसाठी जास्त व्याजदर मिळते म्हणून ज्येष्ठ नागरिकांना जास्त रक्कम गुंतवण्यासाठी एसबीआय सर्वोत्तम ही योजना बेस्ट ठरते. यामध्ये एका वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.10% तर, दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी 7.4% व्याजदर दिले जाते. दरम्यान सामान्यांपेक्षा वरिष्ठांसाठी 0.50% अधिक व्याज मिळते.

Latest Marathi News | SBI FD Interest Rates 13 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x