15 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

SBI Life Certificate | पेन्शनर्ससाठी महत्वाच्या सूचना! या सेवेचा वापर करून पेन्शन सुरु राहील याची काळजी घ्या, अन्यथा नुकसान अटळ

SBI Life Certificate

SBI Life Certificate | पेन्शनधारक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या घरपोच सेवेद्वारे डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो. ही सेवा सशुल्क सेवा आहे. ही सेवा सर्व पेन्शनधारकांना 70 रुपयांत उपलब्ध आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना आयबीपीएस खाते असण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेतून पेन्शन घेणारा खातेदार या सेवेचा लाभ घेऊ शकतो. पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग, टपाल विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून देशभरातील सर्व पेन्शनधारकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाणून घ्या जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केलेल्या मोबाईल अॅपद्वारे तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोअरवरून पोस्ट इन्फो अॅप डाऊनलोड करावं लागेल.

यानंतर अॅप ओपन करा आणि सर्व्हिस रिक्वेस्टवर जा. तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, पिन कोड आणि मोबाईल नंबर सबमिट करावा लागेल. यानंतर तुम्हाला आयपीपीबीमध्ये जाऊन लाइफ सर्टिफिकेट सिलेक्ट करावं लागेल.

यानंतर ओटीपी कन्फर्मेशननंतर डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची तुमची रिक्वेस्ट जवळच्या पोस्ट ऑफिसकडे फॉरवर्ड होईल. 2 दिवसांच्या आत, पोस्टमनला आपल्या घरी जीवन प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठविले जाईल.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेटसाठी पोस्ट पोस्टमन तुमच्या घरी येतो तेव्हा तुम्हाला आधार नंबर, पीपीओ नंबर तयार ठेवावा लागतो. यानंतर पोस्टमन पेन्शनरची सर्व माहिती प्रविष्ट करेल आणि पेन्शनरचे फिंगरप्रिंट घेईल. यानंतर तुम्हाला 70 रुपये रोख द्यावे लागतील.

त्यानंतर हे जीवन प्रमाणपत्र आपल्या पेन्शन वितरण बँकेत पोहोचेल. पेन्शन वितरण बँक आपल्याला एक संदेश पाठवेल ज्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबद्दल माहिती दिली जाईल.

हयातीचा दाखला सादर करणे अत्यंत गरजेचे आहे
भारतात कोट्यवधी लोक आहेत ज्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पेन्शन मिळते, केंद्र सरकारकडे सध्या सुमारे ६९ लाख ७६ हजार पेन्शनधारक आहेत. तर इतके पेन्शनधारक राज्य सरकार व इतर संस्थांचे आहेत.

पेन्शनधारकांना दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र बँकांकडे सादर करावे लागते जेणेकरून तुमची पेन्शन दरवर्षी आपल्या बँक खात्यात येत राहील. तसे न केल्यास तुमची पेन्शन बंद होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI Life Certificate Submission 01 November 2023.

हॅशटॅग्स

#SBI Life Certificate(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x