12 December 2024 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Schneider Electric Share Price | मालामाल शेअर! 400 टक्के परतावा देणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक शेअर्सची खरेदी का वाढली? नेमकं कारण?

Schneider Electric infra Share Price

Schneider Electric Share Price | श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. या कंपनीने नुकताच आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आपल्या ऑपरेटिंग नफ्यात 224 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. हेवी इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत श्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 49.95% टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के घसरणीसह 287.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने महसुलात वार्षिक आधारावर 21 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. या तिमाहीत 410 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ऑपरेटिंग नफा 65 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो वार्षिक आधारावर 224 टक्के वाढला आहे. 18 जुलै 2022 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 108 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 297 रूपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका वर्षात श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरची किंमत 156.82 टक्के वाढली आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ओपन झाले होते. नंतर हा स्टॉक 308 रुपये किमतीवर पोहचला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 294 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2019 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 61 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मागील 4 वर्षांत श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 नोव्हेंबर 2020 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 70 रुपये किमतीवर पोहचला होता. 23 एप्रिल 2021 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 जून 2022 रोजी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 97 रुपये किमतीवर पोहचले होते.

श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मुख्यतः विद्युत नेटवर्क प्रणालीशी संबंधित उत्पादन, डिझाइन, इमारत आणि सेवा तंत्रज्ञान व्यवसायात गुंतलेली आहे. श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, स्विचगियर, मध्यम व्होल्टेज स्विचगियर, संरक्षण, रिले आणि स्मार्ट सिटी ऍप्लिकेशन्स यासारखे उत्पादने सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Schneider Electric Share Price today on 20 July 2023

हॅशटॅग्स

Schneider Electric infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x