15 December 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर फोकसमध्ये, स्टॉक रेटिंग अपडेट, स्टॉक BUY करावा की Sell?

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये (NSE: SJVN) देखील या कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 137.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. शेअर बाजारातील (NSE:SJVN) तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्मने एसजेव्हीएन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने एसजेव्हीएन स्टॉकवर SELL रेटिंग देऊन नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 2.03 टक्के घसरणीसह 133.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एसजेव्हीएन कंपनीच्या बक्सरमधील 1,320 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट कार्यान्वित होण्यास आणखी विलंब लागू शकतो. 2025 च्या अखेरीस युनिट-1 कार्यान्वित होणे अपेक्षित होते, मात्र आता त्याला विलंब होणार आहे. तसेच युनिट-2 देखील 2026 मध्ये कार्यान्वित होणार आहे.

एसजेव्हीएन कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कंपनीने IPO द्वारे एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी कंपनीमधील 20 टक्के भाग भांडवल विकून 2,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे प्री-मनी व्हॅल्युएशन 10000 कोटी रुपये आहे. हे व्हॅल्युएशन गोल्डमन सॅक्सच्या मते, 8,000 कोटीवर आहे.

जून तिमाहीमध्ये एसजेव्हीएन कंपनीने 31 टक्के वाढीसह 357 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत या कंपनीचा महसूल 29 टक्के वाढून 870.4 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याच काळात कंपनीचे एकूण उत्पन्न 29 टक्क्यांनी वाढून 958.47 कोटी रुपये नोंदवले गेले होते.

जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा एकूण खर्च 476.39 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील जून तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 362.60 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एसजेव्हीएन कंपनीमध्ये LIC ने देखील मोठी गुंतवणुक केली आहे. LIC ने या कंपनीचे 8,89,94,881 शेअर्स म्हणजेच 2.26 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

News Title | SJVN Share Price NSE: SJVN 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x