12 December 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Sri Lanka Crisis | श्रीलंका देश 'दिवाळखोर' होण्याच्या मार्गावर | महागाई-बेरोजगारीने लोकं भीषण संकटात

Sri Lanka Crisis

मुंबई, 27 मार्च | भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या सर्वात कठीण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. सामान्य नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करणं जवळपास अशक्य झालं आहे. महागाई आणि बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र नशीब वाईट की त्यात रशिया-युक्रेनच्या युद्धाने भर टाकली आहे. भारताचे शेजारील राष्ट्र श्रीलंका आणि पाकिस्तान महागाई आणि बेरोजगारीची धुसपूसत असून येथील नागरिक तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात (Sri Lanka Crisis) रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत.

India’s neighboring country Sri Lanka is facing its toughest economic crisis these days. Inflation is at its peak :

भारतातही प्रचंड महागाई आणि बेरोजगारी :
विशेष म्हणजे भारतातही महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भारतातील सत्ताधारी पक्षातील नेते सामान्य लोकांना दाऊद, मुंबई बॉम्ब स्फोट आणि सिनेमांच्या असून धार्मिक विषयात गुंतवून ठेवत आहेत जेणेकरून शेजारील देशांप्रमाणे इथली जाणत महागाई आणि बेरोजगारीवर केंद्रित होऊ नये आणि माध्यमांवर त्याची चर्चा रंगू नये.

श्रीलंकेवर युद्धाचा फटका:
ब्लूमबर्गने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या उच्च किंमतीमुळे श्रीलंकेचे आधीच सुरू असलेले आर्थिक संकट अधिक गंभीर झाले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारला आयएमएफची मदत घ्यावी लागली.

एवढेच नाही तर श्रीलंकेच्या कमाईचा मोठा हिस्सा पर्यटन क्षेत्रातून येतो. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर केलेल्या हल्ल्याने श्रीलंकेतील पर्यटन संकट अधिकच वाढले आहे. श्रीलंकेत येणारे बहुतांश पर्यटक हे युरोप, रशिया आणि भारतातून येतात. सरकारी आकडेवारीनुसार, श्रीलंकेच्या GDP मध्ये या क्षेत्राचे योगदान या क्षेत्राच्या 10% पेक्षा जास्त आहे.

एप्रिलमध्ये मदत मिळू शकते :
श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आयएमएफ अनेक पैलूंवर विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, श्रीलंकेला योग्य मदत पॅकेज देण्यासाठी एप्रिलमध्ये चर्चा सुरू होऊ शकते. त्यानंतर देशाचे अर्थमंत्री बासिल राजपक्षे यासाठी वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांचे ते भाऊ आहेत.

श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर :
श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या इतकी बिकट आहे की ती ‘दिवाळखोरी’ होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. ब्लूमबर्गच्या गणनेनुसार, श्रीलंकेवर सध्या परकीय चलनात $3.9 अब्ज कर्ज आहे, तर त्याच्याकडे एकूण परकीय चलनाचा साठा फक्त $2 अब्ज आहे. त्यात $1 अब्ज किमतीचे सार्वभौम रोखे देखील आहेत, ज्यांची मॅच्युरिटी जुलैमध्ये होणार आहे. महागाईची परिस्थिती अशी आहे की, सरकारसमोर आर्थिक आणीबाणी लादण्याबरोबरच पेट्रोल-डिझेल, रॉकेल, रेशन आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यासाठी फौजफाटा उभारण्याची वेळ आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sri Lanka Crisis inflation reached at high level 27 March 2022.

हॅशटॅग्स

#Inflation(53)#Sri Lanka Crisis(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x