13 December 2024 1:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Stocks To Buy | बँक FD मध्ये अशक्य! तज्ज्ञांनी सुचवले हे 3 शेअर्स जे अल्पावधीत तुम्हाला 50 टक्के परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | चालू आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. सेन्सेक्स 66 हजारांच्या खाली तर निफ्टी 19600 च्या खाली क्लोज झाला आहे. मात्र, मिडकॅप निर्देशांक तेजीत वाढत आहे. NIFTY MIDCAP 100 इंडेक्स 37250 अंकाच्या वर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील उलाढालीच्या काळात शेअर बाजारातील तज्ञांनी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग शेअरचे तपशील पाहू..

अमरा राजा बॅटरीज :

शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी बॅटरी निर्माता कंपनी अमरा राजा बॅटरीजमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी 625 रूपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही कंपनी लीड ऍसिड बॅटरी विभागात मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. या कंपनीने लिथियम आयर्न बॅटरी बनवण्याच्या व्यवसायात देखील विस्तार केला आहे. तज्ञांच्या मते 3 वर्षांत या कंपनीचा महसूल वाढीचा दर CAGR 15 टक्के असू शकतो. पुढील 9 ते 12 महिन्यांमध्ये या कंपनीचे शेअर्स 930 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा मिळू शकतो. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 624.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

CCL प्रॉडक्ट्स:

शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी इन्स्टंट कॉफी उत्पादांची निर्यातदार म्हणून ओळखली जाते. या कंपनीने आपला व्यवसाय विस्तार भारतासहित स्वित्झर्लंड आणि व्हिएतनाममध्ये देखील केला आहे. कंपनीचा ग्राहक वर्ग 90 देशांमध्ये विस्तारला आहे. या कंपनीची ऑर्डर बुक देखील मजबूत आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या नफ्यात 20 टक्के वाढ होईल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते पुढील 3-6 महिन्यांत या कंपनीचे शेअर 760 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना अल्पावधीत 25 टक्के नफा मिळू शकतो. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 611.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सुदर्शन केमिकल :

शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी रासायनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुदर्शन केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी पिगमेंटेशन सेगमेंटमध्ये मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. या व्यवसाय विभागातील जगातील चार मोठ्या कंपन्यांमध्ये सुदर्शन केमिकल कंपनीच्या समावेश होतो. सुदर्शन केमिकल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 4000 पेक्षा अधिक प्रकारचे उत्पादने बनवते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील 1-3 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 520 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर 5.98 टक्के वाढीसह 489.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 29 July 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x