Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स लवकरच पुन्हा तेजीत धावणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा समाधान प्रदाता कंपनीने REC या सरकारी कंपनीसोबत कार्यरत भांडवल सुविधांसाठी एक करार केला आहे. या करारा अंतर्गत सुझलॉन एनर्जी कंपनी आपल्या भविष्यातील ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी खेळते भांडवलाची गरज पूर्ण करण्यास सक्षम होणार आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीने मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, REC कंपनी भागीदारीचा उद्देश हा कंपनीची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याची क्षमता वाढवणे हा असेल. सुझलॉन एनर्जी कंपनीने जगभरातील 17 देशांमध्ये प्रभावी 20.3 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता विकसित केल्याची माहिती दिली आहे. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.40 टक्के घसरणीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतात कंपनीच्या 14 उत्पादन सुविधा केंद्र कार्यरत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीला आपली पोहोच आणि कौशल्ये मोठ्या प्रमाणात वाढवायची आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 36.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर सुझलॉन एनर्जी शेअर 37.48 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 44 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
28 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 6.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 8 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्के वाढली आहे.
मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी हिमांशू मोदी यांनी सुझलॉन कंपनीच्या REC लिमिटेड कंपनीसोबत भागीदारीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या मते, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील REC कंपनीचा अनुभव आणि सुझलॉन एनर्जी कंपनीला लोन री-फायनान्स बाबत अधिक सक्षम करेल.
आरईसी लिमिटेड ही कंपनी ‘महारत्न’ दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाराखाली येते. ही कंपनी भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात विविध संस्थांना कर्जासह दीर्घकालीन आर्थिक सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Share Price NSE 20 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News