
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आता नवीन सीईओची नियुक्ती केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीने विवेक श्रीवास्तव यांना कंपनीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्त केले आहे.
विवेक श्रीवास्तव हे WTG विभागाचे सीईओ म्हणून काम करतील. विवेक श्रीवास्तव यांनी 12 फेब्रुवारी 2024 पासून आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 46.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीचे नवीन सीईओ विवेक श्रीवास्तव यांनी अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ते मालवीय प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 1991 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बीपीसीएल या सरकारी कंपनीमधून केली होती. त्यानंतर विवेक श्रीवास्तव यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये 20 वर्षांपेक्षा अधिक काळ विविध पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. नेटवर्क डेव्हलपमेंट, ईपीसी आणि मालमत्ता यासह विविध पोर्टफोलिओ हाताळण्यात विवेक श्रीवास्तव एक्स्पर्ट मानले जातात.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 45.02 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 391.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 637.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.