11 December 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सला उतरती कळा लागली? तज्ज्ञांनी शेअरबाबत दिला सूचक इशारा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 39.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 8 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 पट अधिक वाढले आहेत.

मागील काही महिन्यांच्या सतत तेजीनंतर सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.96 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होती. आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के घसरणीसह 37.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठ महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना सहा पट अधिक परतावा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 45 टक्के वाढीसह 102 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने या तिमाहीत 1417 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी या कंपनीने 1430 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील वर्षी सुझलॉन एनर्जी कंपनीचा EBITDA 169.7 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो आता 32.6 टक्क्यांनी वाढून 225 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 11.9 टक्के नोंदवला गेला होता, जो आता 15.9 टक्क्यांवर पोहचला आहे.

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तत्काळ नफा वसुली करावी. कारण सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मजबूत व्हॉल्यूमसह लोअर लेव्हलवर अनेक ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर विक्रीचा सल्ला दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 303 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 22 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x