31 May 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 01 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला गर्दी IRB Infra Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 58% परतावा, पुढे तेजी येणार? स्टॉक 'Hold' करावा की Sell?
x

Tata Chemical Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! टाटा केमिकल्स शेअरच्या किमतीत मोठी उलाढाल, डिटेल्स पहा

Tata Chemical Share Price

Tata Chemical Share Price Today | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा केमिकल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉक किंचित तेजीत आला आहे. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 934.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारी टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरची किंमत 8 टक्क्यांपेक्षा जास्त पडली होती. BSE इंडेक्सवर टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स घसरुन 926.30 रुपये प्रति शेअर किमतीवर आले होते. (Tata Chemical Limited)

आज मात्र टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये काही प्रमाणात खरेदी होत आहे. टाटा केमिकल्स कंपनीच्या शेअरमधील या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे एक बातमी आहे. टाटा केमिकल्स कंपनीने आपल्या सोडा अॅशच्या किमतीत 3 ते 4 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच ही नकारात्मक बातमी शेअर बाजाराला कळताच गुंतवणूकदारांनी शेअर विकण्यास सुरुवात केली. कंपनीने हा दर कपातीचा निर्णय 17 एप्रिल 2023 पासून अमलात आणला आहे.

सध्या ‘टाटा केमिकल्स’ ही कंपनी सोडा ऍशचे उत्पादन करणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. या कंपनीची जागतिक उत्पादन क्षमता 4.53 दशलक्ष टन असून, कंपनी भारत, यूएस, यूके आणि केनियामध्ये उत्पादन कार्य करते. टाटा केमिकल्स कंपनीने चीनमधील घसरत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर सोडा दर कपातीचा निर्णय घेतला आहे.

लवकरच कंपनी आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करणार असून कंपनीला मजबूत निकालाची अपेक्षा आहे. एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत ‘टाटा केमिकल्स’ कंपनीचे EBITDA मार्जिन 23 टक्क्यांनी वाढले आहे. रेटिंग एजन्सी फिचने आर्थिक वर्ष 2024 ते 2026 पर्यंत कंपनीचा EBITDA मार्जिन 16 से 17 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Chemical Share Price Today on 19 April 2023.

हॅशटॅग्स

Tata Chemical Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x